PHOTO : इथं नाही एकही पुरुष; फक्त महिला आणि मुलांचं अनोखं गाव माहितीये?

Womens Village : जगाच्या नकाशावर एक असं गाव आहे जिथे एकही पुरुष नाही. हे गावं फक्त महिला आणि मुलांचं आहे. तुम्हाला माहितीय हे गाव कुठलं आहे ते?

Apr 30, 2024, 16:34 PM IST
1/7

या गावाची स्थापना 1990 मध्ये 15 महिलांनी केली. या महिलांना ब्रिटिश सैनिकांनी लैंगिक शोषणाला झुगारुन त्यांनी या अनोख्या गावाची निर्मिती केली. 

2/7

उत्तर केनियामधील सुंबुरी प्रांतातील हे उमोजा नावाचं गाव आहे. या गावात कोणत्याही पुरुषाला येण्याची परवानगी नाही. 

3/7

रेबेका लोलोसोली या महिलाने महिल्यांवरील लैंगिक अत्याचारा विरोधात एक वेगळं गाव निर्माण करण्याचा निर्णय घेतला. 

4/7

रेबेका या देखील एका पुरुषांच्या अत्याचाराच्या बळी ठरल्या होत्या. आता या गावात पाच ते 10 कुटुंबाच्या समुहात या महिला एकत्र नांदतात. 

5/7

सध्या या गावात 47 महिला 200 मुलं एकत्र राहतात आहे. जंगलात सापडणारे मध आणि काही हस्तकला याच्या माध्यमातून या महिला आपला उदरनिर्वाह करतात. 

6/7

हे उमोजा गाव ज्या जमिनीवर वसलंय यासाठी 30 वर्षांची लढाई करुन या महिलांनी ती जमीन आपल्या नावावर केली आहे. 

7/7

या गावातील शाळा असो किंवा कुठलाही व्यवहार हे महिला पाहतात. शिवाय या गावात बाहेरून देखील फक्त महिलांच एन्ट्री आहे.