Shani Jayanti 2024 : सर्वार्थसिद्धी योगावर शनी जयंती! 'या' राशींवर आर्थिक लाभासह प्रत्येक कामात यश?

Shani Jayanti 2024 : कर्माचा दाता आणि न्यायदेवता शनिदेवाची आज जयंती आहे. शनि जयंतीला आज अनेक शुभ योग निर्माण झालंय. याचा फायदा काही राशींच्या जाचकाला होणार आहे.     

नेहा चौधरी | Updated: May 8, 2024, 09:40 AM IST
Shani Jayanti 2024 : सर्वार्थसिद्धी योगावर शनी जयंती! 'या' राशींवर आर्थिक लाभासह प्रत्येक कामात यश? title=
Shani Jayanti on sarvartha siddhi yoga Success in every work with financial benefits on these zodiac signs

Shani Jayanti 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात 9 ग्रहांचा जाचकांवर विशेष परिणाम होतो. या 9 ग्रहांपैकी शनिदेवाची मानवाला भीती वाटते. शनिदेव हा कर्म आणि न्यायदेवता आहे. तुमचे कर्म चांगेल असतील तर त्याच शुभ फळ मिळतं. तर कर्म वाईट असतील तर शनिदेव तुम्हाला शिक्षा देतो अशी मान्यता आहे. आज सूर्यदेवाचा पुत्र शनिदेवाची जयंती आहे. आज शनि जयंतीच्या दिवशी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अनेक शुभ योग जुळून आले आहेत. पंचांगानुसार सर्वार्थ सिद्धी योग आहे. तर शनिदेव मूळ त्रिकोणी आणि स्वगृही कुंभ राशीत विराजमान आहे. शनिदेव एका राशीतून दुसऱ्या राशीत सर्वात मंद गतीने गोचर करत असतो. तो साधारण एका राशीत अडीच वर्ष वास्तव करतो. आज शनि जयंतीचा शुभ योग काही काही राशींच्या लोकांसाठी नशीब चमकवणारा ठरणार आहे. (Shani Jayanti on sarvartha siddhi yoga Success in every work with financial benefits on these zodiac signs)

'या' राशींवर बरसणार शनिदेवाची कृपा!

मेष रास (Aries Zodiac)  

या राशीच्या लोकांसाठी शनिदेव वरदान ठरणार आहे. या राशीच्या लोकांना अमाप संपत्तीचा लाभ होणार आहे. पैशाच्या घरात शनि असल्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. आर्थिक घरात असल्याने शनिदेव तुम्हाला आर्थिक संकटातून बाहेर काढणार आहे. कुटुंबासोबत आनंदी वेळ जाणार आहे. नशिबाची साथ तुम्हाला मिळणार आहे. नोकरदार लोकांच्या आयुष्यातही सकारात्मक परिणाम दिसणार आहे. बढती आणि वेतनवाढीचे संकेत आहेत. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

हेसुद्धा वाचा - Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला 'या' लोकांवर बसरणार शनिदेवाची कृपा, तब्बल 100 वर्षांनंतर शश राजयोग

मिथुन रास (Gemini Zodiac)

या राशीच्या लोकांनाही शनिदेवाची विशेष कृपा राहणार आहे. या राशीच्या लोकांचा अध्यात्माकडे जास्त कल असणार आहे. तुम्ही कोणत्याही धार्मिक स्थळी किंवा कार्यक्रमाला जाणार आहात. मानसिक तणावातून काही प्रमाणात आराम मिळणार आहे. सकारात्मक बाजूने तुम्ही काहीतरी चांगले करण्याचा प्रयत्न कराल त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. तुमच्या बुद्धिमत्तेने आणि संयमाने कोणत्याही आव्हानावर मात करु शकणार आहात. आपण काहीतरी नवीन शिकणार आहात. तुम्हाला भविष्यात यश आणि प्रसिद्धी मिळणार आहे. आर्थिक लाभाचही भाकीत करण्यात आलंय. 

कुंभ रास (Aquarius Zodiac) 

या राशीच्या लोकांवरही शनिदेव कृपा असणार आहे. या राशीच्या लोकांना काहीतरी नवीन करण्याची संधी मिळणार आहे. शनिदेव कुंभ राशीत असल्याने तुमच्या जीवनात समृद्धी येणार आहे, असं भाकीत करण्यात आलंय. कुंभ राशीच्या लोकांवर शनी साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. अशा स्थितीत आयुष्यात संकट येतील पण शनिदेवाच्या कृपेने त्यावर तुम्ही सहज मात करणार आहात. कुटुंबासोबत आनंददायी वेळ जाणार आहे. आयुष्यात आता फक्त आनंदच आनंद असेल, असं भाकीत करण्यात आलंय. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)