ट्रिपल त्रिग्रही योगामुळे 'या' राशींचं बँक बॅलेन्स होणार दुप्पट, प्रत्येक क्षेत्रात मिळणार यश?

Triple Trigrahi Yog In May 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती ही मानवी जीवनावर सर्वाधिक परिणाम करते. ग्रहांचे संक्रमण हे कुंडलीत अनेक योग निर्माण करत असतात. अशात लवकरच ट्रिपल त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. याचा लाभ कोणाला होणार जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: May 8, 2024, 09:12 AM IST
ट्रिपल त्रिग्रही योगामुळे 'या' राशींचं बँक बॅलेन्स होणार दुप्पट, प्रत्येक क्षेत्रात मिळणार यश? title=
Triple trigrahi yoga will double the bank balance of this zodiac sign success in every field

Trigrahi Yog In Kundli : प्रत्येक महिन्यात 9 ग्रहांपैकी कोणता कोणता ग्रह आपली स्थिती बदल असतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मे महिना हा ग्रह गोचरच्या दृष्टीकोनातून अतिशय भाग्यशाली आहे. महिन्याच्या पहिल्या तारखेला गुरु वृषभ राशीत संक्रमण केलंय. यासोबत आता मे महिन्यात ग्रहांचा राजकुमार बुध, ग्रहांचा राजा सूर्यदेव आणि संपत्तीचा कारक शुक्र आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांच्या या स्थिती बदलामुळे अनेक योग निर्माण होणार आहे. मे महिन्यात ग्रहांच्या संयोगामुळे त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे मे महिन्यात तीन वेळा त्रिग्रही योग तयार होणार आहे. या ट्रिपल त्रिग्रही योगामुळे 12 पैकी 3 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळणार आहे. (Triple trigrahi yoga will double the bank balance of  this zodiac sign success in every field)

ट्रिपल त्रिग्रही योग कधी आणि कुठल्या राशीत तयार होणार आहे?

वृषभ राशीतील धन घरात शुक्र, गुरु आणि सूर्य यांच्या मिलनातून पहिला त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. त्यानंतर मेष राशीच्या स्वर्गीय घरात बुधाच्या प्रवेशाने शुक्र आणि सुर्यासोबत दुसऱ्यांदा त्रिग्रही योग बनतोय. आणि तिसरा त्रिग्रही योग हा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सर्वप्रथम जर आपण त्रिग्रही योगाबद्दल बोललो तर ते वृषभ राशीच्या धन गृहात तयार होत आहे . यामध्ये शुक्र, गुरु आणि सूर्य यांचा संयोग आहे. यासोबतच मेष राशीच्या स्वर्गीय घरात बुध प्रवेश केल्याने दुसरा त्रिग्रही योग तयार होत आहे. तर तिसऱ्या त्रिग्रही योग बाराव्या घरात मंगळ, बुध आणि राहू यांच्या संयोगातून निर्माण होतोय. 

'या' राशींना होणार तिप्पट फायदा!

मेष रास (Aries Zodiac)  

बुध, शुक्र आणि सूर्य त्रिग्रही योग या राशीच्या लोकांसाठी मे महिना आर्थिक दृष्टीकोनातून खूप शुभ ठरणार आहे. यासोबतच तुम्हाला परदेश प्रवासाची संधी मिळणार आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याच स्वप्न पूर्ण होणार आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत तुम्हाला गवसणार आहे. यामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. तुमचं संपूर्ण लक्ष कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थितीवर राहणार आहे. नोकरदार आणि व्यावसायिक लोकांना या त्रिग्रही योगा जबरदस्त फायदा होणार आहे. करिअरमध्ये खूप प्रगती होणार आहे. कधीही विचारही केला नाही अशा नोकरीची संधी मिळणार आहे. तुमच्या आतापर्यंतच्या मेहनतीच फळं मिळणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून काय नवीन गुंतवणुकीतूनही फायदा मिळणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Surya Gochar 2024 : अक्षय्य तृतीयेनंतर ग्रहांचा राजा सूर्यदेव वृषभ राशीत, 'या' लोकांच्या नशिबात कुबेराचा खजिना?

वृषभ रास (Taurus Zodiac) 

त्रिग्रही योग या राशीच्या लोकांचे भाग्य चमकवणार आहे. अनेक ग्रहांच्या आशीर्वादाने प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामं मार्ग लागणार असून तुमच्या बँक बॅलेन्समध्ये वाढ होणार आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत तुम्हाला सापडणार आहे. ज्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यापासून मुक्तता मिळणार आहे. शिवाय भविष्यासाठी बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होणार आहात. कुटुंबासोबत चांगला वेळ जाणार आहे. समाजात मान-सन्मान द्विगुणीत वाढणार आहे. कुटुंबासोबत सुरू असलेले मतभेद संपुष्टात येणार आहे. तुमच्या बौद्धिक कौशल्याने आणि बोलण्याच्या शैलीने तुम्ही अनेक प्रकल्प, करार आपल्या नावावर करणार आहात. 

मिथुन रास (Gemini Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग फायदेशीर सिद्ध होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला असणार आहे. नवीन माध्यमातून तुमच्या उत्पन्नात भरमसाठ वाढ होणरा आहे. तसंच, जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला फायदे मिळणार आहेत. नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला लाभणार आहेशेअर बाजाराशी संबंधित लोकांसाठी मे महिना खूप भाग्यशाली ठरणार आहे. मात्र अंगारक योग तयार झाल्यामुळे घाईघाईत कोणतीही गुंतवणूक करु नका.  

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)