Video: ऑस्ट्रेलियन तरुणीच्या रोहितसाठी मराठीत घोषणा! मुंबईकर सौंदर्याने घायाळ

Austrialian Girl Chants Cha Raja Rohit Sharma: मुंबईतील वानखेडे स्टेडियमबाहेर या तरुणीने मुंबईकर चाहत्यांबरोबर रोहित शर्माच्या नावाचा जयघोष केल्याचं पाहायला मिळालं.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 8, 2024, 12:36 PM IST
Video: ऑस्ट्रेलियन तरुणीच्या रोहितसाठी मराठीत घोषणा! मुंबईकर सौंदर्याने घायाळ title=
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Austrialian Girl Chants Cha Raja Rohit Sharma: आयपीएल 2024 मधील सलग चार सामन्यांमध्ये पराभव झाल्यानंतर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या संघाने सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा सामना जिंकला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाला मुंबईच्या संघाने 7 विकेट्स आणि 16 बॉल राखून पराभूत केलं. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यापूर्वी प्रेक्षकांबरोबर संवाद साधताना चक्क एक ऑस्ट्रेलियन तरुणी रोहित शर्मासाठी मराठीत घोषणा देताना दिसली.

रोहितवरील प्रेम पाहून भारावून गेली

सामन्यापूर्वी मैदानाबाहेर चाहत्यांशी संवाद साधण्याची जबाबदारी स्टार स्पोर्ट्सने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मॅथ्यू हेडनची कन्या ग्रेस हेडनवर सोपवली होती. निळ्या रंगातील जर्सी, चेहरा आणि अंगावर लावलेला निळा रंग, रोहित शर्माच्या नावाचा जयघोष अशा साऱ्या वातावरणात ग्रेस मुंबईच्या चाहत्यांशी चर्चा करत होती. ग्रेस यांच्या आयपीएलच्या पर्वामध्ये प्रेझेंटर म्हणून काम करत आहे. मुंबईतील सामन्याआधी मैदानाबाहेरील वातावरणाचा आढावा घेताना मुंबईच्या चाहत्यांचं रोहितवरील प्रेम पाहून ती भावरून गेली. 

तिनेही दिल्या मराठीत घोषणा

रोहित शर्मासाठी मुंबईच्या चाहत्यांमध्ये असलेले क्रेज किती आहे याचा अंदाज ग्रेसला या कार्यक्रमादरम्यान आला. ग्रेसने अनेक मुंबईकर चाहत्यांशी संवाद साधला. स्टार स्पोर्ट्सने शेअर केलेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये ग्रेसला मुंबईकर चाहत्यांनी मराठीतील घोषणाही शिकवल्याचं दिसत आहे. रोहितसाठी भारतात कुठेही गेल्यानंतर दिली जाणारी 'मुंबईचा राजा, रोहित शर्मा' ही घोषणा चाहत्यांनी ग्रेसला शिकवली. ग्रेसनेही शब्द अन् शब्द समजून घेत 1, 2, 3 च्या काऊंटडाऊनवर 'मुंबईचा राजा, रोहित शर्मा' अशी घोषणा देत त्यांच्या जल्लोषात सहभागी होण्याची संधी साधून घेतली. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...

चाहते सौंदर्यावर फिदा

त्यानंतर ग्रेस वानखेडे स्टेडियममध्ये गेली आणि तिथेही तिने चाहत्यांशी संवाद साधला. सोशल मिडियावर अनेक क्रिकेट चाहत्यांनी ग्रेसच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

1)

2)

3)

सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, सूर्यकुमार यादवने 51 बॉलमध्ये नाबाद 102 धावा करत मुंबईला विजय मिळवून दिला. 174 धावांचा पाठलाग करताना सूर्यकुमारने आयपीएल करिअरमधील आपलं वैयक्तिक दुसरं शतक झळकावलं.