CSK vs LSG highlights, IPL 2024 : चेपॉकतच्या मैदानात सर्वात मोठी रन चेस, लखनऊचा 6 विकेट्सने विजय

CSK vs LSG Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 39 व्या सामन्यात आज चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्ससमोर लखनऊ सुपर जाएंट्सचे (Chennai Super Kings vs Lucknow Supergiants) आव्हान असणार आहे. 

CSK vs LSG highlights, IPL 2024 : चेपॉकतच्या मैदानात सर्वात मोठी रन चेस, लखनऊचा 6 विकेट्सने विजय

Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Live Score in Marathi:  ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणारी सीएसके या आयपीएलमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे. पॉइंट्स टेबलमध्ये 7 सामन्यात चेन्नई 8 पॉइंट्ससोबत चौथ्या क्रमांकावर आहे, तर के एल राहूलच्या कॅप्टन्सीखाली खेळणारी लखनऊ सुपर जाएंट्स ही 7 सामन्यात 4 मॅच जिंकून 8 पॉइंट्ससोबत पाचव्या क्रमांकावर आहे. तर आज बघण्यायोग्य गोष्ट असणार की, लखनऊ आज चेन्नईच्या होमग्राउंडवर विजय मिळवू शकते की नाही, कारण या सिजमनध्ये आतापर्यंत आपल्या होमग्राउंडवर चेन्नई सुपर किंग्सने एकही सामन्यात पराभव पत्कारलेला नाहीये, अशातच आज कोणता संघ वरचढ ठरणार हे यावर साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.  

23 Apr 2024, 20:22 वाजता

10 ओव्हरनंतर सीएसकेचा स्कोर 85-2 असा आहे. गायकवाड आणि जडेजा यांच्यात 36 धावांची भागादारी झालेली आहे, तर दुसऱ्या विकेटनंतर. या दोघं फलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजीला सांभाळलं आहे.

23 Apr 2024, 20:16 वाजता

9 व्या ओव्हरमध्ये सीएसकेचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने 28 बॉसमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. गायकवाडच्या या इनिंगमध्ये एकूण 7 चौके सामील आहे.

23 Apr 2024, 19:58 वाजता

6 व्या ओव्हरमध्ये चेन्नईला दुसरा धक्का लागला आहे. डॅरेल मिचेल हा 9 धावांवर यश ठाकूरच्या बॉलिंगवर आउट झाला आहे. यश ठाकूरने डॅरेलची कॅच 4 धावांवर सोडली होती, पहिल्या विकेटनंतर रविंद्र जडेजा हा फलंदाजीसाठी आलाय.

23 Apr 2024, 19:52 वाजता

5 ओव्हरनंतर चेन्नई सुपर किंग्सचा स्कोर 48-1 असा आहे. सीएसकेचा कॅप्टन ऋतुराज हा 36 धावांवर नाबाद आहेस तर डॅरेल मिचेल याला एक जीवनदान मिळाल्यानंतर तो सुद्धा 11 धावांवर खेळत आहे.

23 Apr 2024, 19:36 वाजता

पहिल्याच ओव्हरमध्ये मॅट हेनरीने सीएसकेला पहिला धक्का दिला आहे. अजिंक्य रहाने हा फक्त 1 धावावर आउट झाला आहे. पहिल्या विकेटनंतर डॅरल मिचेल हा फलंदाजीसाठी आला आहे.

23 Apr 2024, 19:05 वाजता

लखनऊ सुपर जाएंट्सचा टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

LSG प्लेइंग 11 -

क्विंटन डी कॉक, केएल राहुल (C/W), मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसीन खान, यश ठाकूर

CSK प्लेइंग 11 -

अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड (C), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (W), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना

23 Apr 2024, 18:08 वाजता

CSK vs LSG head to head :

आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्स आणि लखनऊ सुपर जाएंट्स हे दोघं संघ एकूण 4 वेळेस आमनेसामने आले आहेत, त्यातून आश्चर्याने लखनऊने चेन्नईवर वर्चस्व निर्माण करत 2 वेळेस सीएसकेला पराभूत केलं आहे. तर चेन्नई फक्त एकवेळेस या लढतीत जिंकली आहे. एक सामना हा पावसाच्या व्यत्ययामुळे खेळला गेला नव्हता म्हणून त्या सामन्यात कोणताही रिझल्ट आलेला नाही. तर आज चेन्नईच्या होमग्राउंडवर लखनऊ जिंकणार की चेन्नई आपला हिशोब बरोबर करणार हे बघण्यायोग्य ठरणार आहे.