..म्हणून फरदीन 14 वर्ष चित्रपटांपासून दूर होता; जाणून घ्या या ब्रेकचं SRK कनेक्शन

दमदार पुनरागमन

मनोरंजनसृष्टीपासून तब्बल 14 वर्ष दूर राहिल्यानंतर फरदीन खानने दमदार पुनरागमन केलं आहे.

'हिरामंडी'तून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

संजय लिला भन्साळींच्या 'हिरामंडी' या वेब सिरीजमधून फरदीन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

'नेटफ्लिक्स'वर 1 मे रोजी प्रदर्शित

संजय लिला भन्साळींची पहिलीच वेब सिरीज असलेल्या 'हिरामंडी'चे आठ भाग 'नेटफ्लिक्स'वर 1 मे रोजी प्रदर्शित झाले.

2010 साली प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट

'हिरामंडी'मधून 2024 साली प्रेक्षकांच्या भेटीस येण्याआधी फरदीन 2010 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात झळकला होता.

शाहरुख खान आणि सुष्मिता सेनही होते

फरदीनचा हा 2010 या चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि सुष्मिता सेन हे दोघेही महत्त्वाच्या भूमिकेत होते.

असं काय घडलं?

या चित्रपटाच्या शूटदरम्यान असं काय झालं की फरदीन 14 वर्ष छोट्या तसेच मोठ्या स्क्रीनपासून दूर राहिला हे पाहूयात..

कोणता होता हा चित्रपट?

फरदीनच्या या चित्रपटाचं नाव होतं 'दुल्हा मिल गया'! दिग्दर्शक मुद्दसर अझिजचा हा पाहिलाच चित्रपट होता.

फरदीनने साकारलेली श्रीमंत तरुणाची भूमिका

या चित्रपटात फरदीनने श्रीमंत तरुणाची भूमिका साकारलेली जो एका गावतील मुलीशी (इशिता शर्माशी) लग्न करतो.

सुष्मिताची भूमिका काय होती?

वडिलांची संपत्ती मिळावी म्हणून फरदीनने हे लग्न केलेलं असतं. नंतर तो पत्नीला सोडून देतो. त्यानंतर त्याची पत्नी तिच्या मैत्रिणीच्या म्हणजेच सुष्मिताच्या मदतीने पुन्हा फरदीनचं मन जिंकते.

शाहरुखचं स्पेशल अपेरन्स

या चित्रपटामध्ये शाहरुख खानने स्पेशल अपेरन्स म्हणून हजेरी लावताना सुष्मिताच्या बॉयफ्रेण्डची भूमिका साकारली होती. तो चित्रपटाच्या उत्तरार्धात दिसला होता.

निर्मात्यांचा खर्चही निघाला नाही

22 कोटी खर्च करुन बनवलेल्या फरदीनच्या या चित्रपटाने भारतात केवळ 3.08 कोटींची आणि जगभरात 6.48 कोटींची कमाई केली.

बाहेर फेकला गेला

या अपयशानंतर फरदीन मनोरंजनसृष्टीतून बाहेर फेकला गेला.

भूमिकेचं कौतुक

मात्र आता तब्बल 14 वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या फरदीनच्या 'हिरामंडी'मधील भूमिकेचं कौतुक केलं जात आहे.

सेकेण्ड इनिंग

'हिरामंडी'च्या माध्यमातून फरदीनने सेकेण्ड इनिंग सुरु केल्याची चर्चा सध्या मनोरंजनसृष्टीत आहे.

VIEW ALL

Read Next Story