रोजच्या डाळीला उत्तम पर्याय आहे कोकणातील 'हा' पदार्थ; भाताची लज्जत वाढेल

रोज-रोज डाळ खावून वैतागला असाल तर आज हा कोकणातील पदार्थ करुन पाहाच

कोकणात कुळथाची पिठी मोठ्या प्रमाणात केली जाते. पौष्टिक आणि पारंपारिक पिठीची रेसिपी जाणून घ्या

साहित्य

एक वाटी कुळीथाचं पीठ, एक मोठा कांदा, एक टोमॅटो, आठ-दहा लसूण पाकळ्या, फोडणीसाठी जिरं-मोहरी, दीड चमचा मिरची पावडर, थोडी हळद, दीड पळी तेल, चवीपुरतं मीठ-साखर.

कृती

सर्वप्रथम एका भांड्यात कुळीथाचं पीठ घेऊन त्यात पाणी ओतून ते नीट एकजीव करुन घ्या. पीठात कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या राहू देऊ नका

गॅसवर कढाई ठेवून त्यात फोडणीसाठी तेल टाकून घ्या. तेल चांगलं तापल्यानंतर त्यात जिरं-मोहरीची फोडणी द्या.

फोडणी तडतडल्यानंतर त्यात लसूण ठेचून टाका. नंतर बारीक चिरलेला कांदा व टॉमेटो टाका

कांदा चांगला शिजल्यानंतर त्यात हळद, मिरची पावडर, चवीपुरते मीठ आणि चिमूटभर साखर टाकून हे मिश्रण चांगलं शिजवून घ्या.

मिश्रण चांगंल शिजवून घेतल्यानंतर त्यात पाण्यात एकजीव करुन घेतलेले कुळीथाचे पीठ टाका आणि झाकण ठेवा

पाच मिनिटांनंतर एकदा मिश्रण ढवळून घ्या. पीठाचा सुंगंध आल्यानंतर गॅस बंद करा. भातासोबत पीठी खूप छान लागते.

VIEW ALL

Read Next Story