'या' नेत्याच्या रोड शोसाठी प्राजक्ता माळी चंद्रपुरात!

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

मालिका, चित्रपटातून तिने चाहत्यांची मनात घर केले आहे.

अभिनयाबरोबरच ती तिचे निरनिराळे छंद ही जोपासत आहे. अलीकडेच तिने स्वतःचा प्राजक्तराज हा ब्रँड लाँच केला आहे.

सोशल मीडियावरील प्राजक्ताच्या पोस्टही लक्षवेधी असतात. राजकारणातील घडामोडींवरही ती भाष्य करते.

सध्या महाराष्ट्रात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. स्टार प्रचारक म्हणून प्राजक्ताही यात सहभागी होत आहे.

19 एप्रिल रोजी राज्यात पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. पाच मतदारसंघात मतदान होत आहे.

17 एप्रिलपासून अचारसंहिता लागू होत आहे. त्यापूर्वीच प्राजक्ता माळी एका राजकीय रोड शोमध्ये सहभागी होणार आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात म्हणजेच चंद्रपूरमध्ये होणाऱ्या रोड शोमध्ये प्राजक्ता सहभागी होत आहे.

16 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता रोड शोला सुरुवात होणार आहे.

VIEW ALL

Read Next Story