आयपीएलच्या 33 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चुरशीच्या सामन्यात पंजाब किंग्सचा 9 धावांनी पराभव केला. मुंबईचा हा तिसरा विजय ठरलाय.

मुंबई जिंकली असली तरी एक नवा वाद समोर आला आहे. मुंबईचा खेळाडू टिम डेव्हिडवर चिटिंगचा आरोप करण्यात आला आहे.

मुंबई आणि पंजाबदरम्यानच्या सामन्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत डेव्हिड डगआऊटमध्ये बसून DRS चा इशारा करताना दिसत आहे.

मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीदरम्यान 15 षटकात अर्शदीप सिंगने टाकलेला एक चेंडू स्टम्पपासून भरपूर बाहेर गेला.

मैदानावर असलेल्या अंपायरने हा चेंडू वाईड दिला नाही. त्याचवेळी डगआऊटमध्ये बसलेल्या टिम डेव्हिडने सूर्यकुमारला रिव्ह्यूचा इशारा केला.

यानंतर सूर्यकुमारने रिव्ह्यू घेतला. थर्ड अंपायरने रिप्ले पाहिल्यानंतर वाईड बॉलचा निर्णय दिला. पंजाबच्या सॅम करनने हा प्रकार पाहिला आणि त्याने अंपायरकडे तक्रार केली.

पण अंपायरने तक्रारीकडे दुर्लक्ष करत सूर्यकुमारला रिव्ह्यू घेण्याची परवानगी दिली. नियमानुसार DRS घेताना मैदानावरी खेळाडू मैदानाबाहेरुन खेळाडू किंवा कोचकडून मदत घेऊ शकत नाही.

VIEW ALL

Read Next Story