आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कपला 2 जूनपासून सुरुवात होणार आहे. यंदा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत ही स्पर्धा रंगणार आहे.

टी20 वर्ल्ड कपमध्ये पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानचा संघ एकाच गटात आहेत. स्पर्धेसाठी पाकिस्तानची जोरदार तयारी सुरु आहे.

स्पर्धेआधी पाकिस्तानी क्रिकेटपटूंना एक गुड न्यूज मिळाली आहे. टी20 वर्ल्ड कप जिंकल्यास पाकिस्तानचे खेळाडू मालामाल होणार आहेत.

पाकिस्तानने टी20 वर्ल्ड कप जिंकल्यास संघातील प्रत्येक खेळाडूला एक लाख डॉलर म्हणजे 83,47 लाख रुपये मिळणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ही घोषणा केलीय.

पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या टी20 मालिकेसाठी आयर्लंड आणि इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. पीसीबी प्रमुख मोहसिन नकवी यांनी खेळाडूंबरोबर चर्चा केल्यानंतर ही घोषणा केली.

यंदाच्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानचा संघ जेतेपद पटकावेल अशी अपेक्षा मोहसिन नकवी यांनी व्यक्त केली आहे.

टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा हाय व्होल्टाज सामना 9 जूनला अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये रंगणार आहे.

VIEW ALL

Read Next Story