कारमध्ये AC चा स्पीड किती असावा? फॅन स्पीडने मायलेज कमी होतो का?

ऊन्हाचा पारा चढला असल्याने घरात बंद पडलेले एसी आता दिवसभर सुरु ठेवले जात आहेत. कारमध्ये प्रवास करतानाही एसी वापरला जात आहे.

पण कारमधील एसी वापरताना अनेक प्रश्न काहींना सतावत असतात.

कारमधील एसीचा स्पीड कमी जास्त केल्यास त्याचा मायलेजवर परिणाम होतो असं अनेकांना वाटतं. हे खरं आहे का जाणून घ्या.

कारच्या एसीचा मेकॅनिजन पूर्णपणे इंजिनशी जोडलेला असतो. यामुळे एसीच्या वापराचा कारच्या मायलेजवर परिणाम होतो.

एसी सुरु केल्यानंतर इंजिनवर अतिरिक्त ओझं पडतं. एसी कंप्रेसरमुळे हे होतं, जे इंजिनद्वारे बेल्टच्या माध्यमातून चालवलं जात असतं. कंप्रेसर चालवण्यासाठी एनर्जीची गरज असते जी इंजिनपासून मिळते.

दुसरीकडे एसीचा पंखा कारची बॅटरी म्हणजेच इलेक्ट्रिकल सिस्टमशी कनेक्ट असतो. जो फक्त हवेला केबिनमध्ये पाठवण्याचं काम करतो.

एसीच्या पंख्याला बॅटरीकडून एनर्जी मिळते. यामुळे त्याला कमी किंवा जास्त केल्याने कारचं इंजिन किंवा मायलेजवर परिणाम होतो. म्हणजे तुम्ही एसी 1 वर चालवा किंवा 4 वर, इंधन तितकंच लागणार आहे.

VIEW ALL

Read Next Story