स्टँडचा नेमका वापर

पिझ्झावर असणाऱ्या 'या' लहानशा स्टँडचा नेमका वापर काय? 99 टक्के उत्तरं चुकली

कमालीचा लोकप्रिय

मुळचा हा परदेशातील पदार्थ भारतातही कमालीचा लोकप्रिय. अशा या पिझ्झाची होम डिलीव्हरी किंवा एखाद्या हॉटेलात तो बॉक्समधून टेबलवर आला तर एक लहानशी गोष्ट लक्ष वेधते.

लहानसा स्टँड

पिझ्झा कितीही चवीष्ट दिसत असला तर सर्वात आधी हात पुढे जातो तो म्हणजे त्यावर असणारा लहानसा स्टँड बाजूला करण्यासाठी.

समज अतिशय चुकीचा

अनेकांच्या मते पिझ्झाचे तुकडे एकसंध ठेवण्यासाठी या स्टँडचा वापर होतो. पण, हा समज अतिशय चुकीचा आहे.

पिझ्झा सेवर

हा लहानसा स्टँड पिझ्झा सेवर किंवा पिझ्झा ट्रायपॉड म्हणून ओळखला जातो. बॉक्स टेंट, पिझ्झा टेबल ही त्याची दुसरी नावं. कार्मेला विटाले यांनी या लहानशा स्टँडचा शोध लावला होता.

टॉपिंग

पिझ्झा बॉक्समध्ये ठेवल्यानंतर त्याच्या झाकणाची बाजू पिझ्झाच्या पृष्ठावर अर्थात टॉपिंग आणि चीझवर टेकू नये यासाठी या इवल्याश्या टेबलचा वापर होतो.

पिझ्झाची वाफ

पिझ्झा गरम असतानाच बॉक्स बंद केला जातो. अशा वेळी कागदी बॉक्सला पिझ्झाची वाफ लागून तो त्याच्या संपर्कात येऊ नये म्हणून हा स्टँड वापरतात.

होम डिलीव्हरी

पिझ्झाची होम डिलीव्हरी होत असताना एकावर एक अनेक बॉक्स ठेवले जातात. अशा वेळीसुद्धा हे स्टँडत पिझ्झा सुरक्षित ठेवण्याचं काम करतात.

VIEW ALL

Read Next Story