रशियाच्या 8 भागात युक्रेनचा ड्रोन हल्ला, 3 पॉवर स्टेशन आणि इंधन डेपो नष्ट, रशियाकडून 50 ड्रोन हल्ल्याचा दावा

युक्रेनियन स्पेशल फोर्सने लांब पल्ल्याच्या ड्रोनने रशियात 8 ठिकाणी हल्ले केले. ही घटना शनिवारी रात्रीची आहे. यात रशियातील 3 ऊर्जा केंद्रे आणि एक इंधन भांडार नष्ट झालंय तर दोन जणांचा मृत्यू झालाय. 

नेहा चौधरी | Updated: Apr 22, 2024, 08:52 AM IST
रशियाच्या 8 भागात युक्रेनचा ड्रोन हल्ला, 3 पॉवर स्टेशन आणि इंधन डेपो नष्ट, रशियाकडून 50 ड्रोन हल्ल्याचा दावा title=
Ukraine drone strike in 8 areas of Russia 3 power stations and fuel depots destroyed Russia claims 50 drone strikes

अमेरिकन मीडिया सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे युक्रेनने रशियनमधील 8  ठिकाणी लांब पल्ल्याच्या स्ट्राइक ड्रोनने हल्ला केला. या हल्ल्यात इंधन डेपो आणि पॉवर सबस्टेशनला लक्ष्य करण्यात आले. (Ukraine drone strike in 8 areas of Russia 3 power stations and fuel depots destroyed Russia claims 50 drone strikes)

वृत्तसंस्था रॉयटर्सने बेल्गोरोड शहराच्या गव्हर्नरच्या हवाल्याने सांगण्यात आलंय की, या हल्ल्यात दोन नागरिकांचाही बळी गेला आहे. तर रशियाच्या संरक्षण मंत्रालयानेही या हल्ल्याला दुजोरा दिलाय. रशियाच्या संरक्षण यंत्रणेने युक्रेनचे सुमारे 50 ड्रोन पाडले असल्याचा दावा केलाय. 

महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी रशियानेही असे हल्ले करून युक्रेनमधील ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य केलं होतं. युक्रेनमधील दुष्काळामुळे तापमानात सातत्याने घसरण होताना पाहिला मिळत आहे. हवामान विभागानुसार सध्या तिथलं तापणान हे  मायनसमध्ये आहे. याचाच फायदा घेत रशियन सैन्य युक्रेनवर हल्ला करत आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रासाला सामोरे जावं लागतंय. 

युक्रेनच्या सुरक्षा संस्थांचं संयुक्त ऑपरेशन

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, शनिवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास युक्रेनने रशियाच्या 8 भागात आपले अनेक ड्रोन पाठवले होते. या ड्रोन हल्ल्यात लष्करी संबंधित उद्योगांना ऊर्जा पुरवणारी रशियाची ऊर्जा पायाभूत सुविधेला लक्ष्य करण्यात आले. 

वृत्तानुसार, हा हल्ला युक्रेनच्या सुरक्षा सेवा, संरक्षण गुप्तचर आणि विशेष दलांनी संयुक्तपणे केल्याच समोर आलंय.  या ड्रोन हल्ल्यानंतर अनेक भागात वीज आणि पाणीपुरवठा ठप्प झालाय. 

रशियाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी हल्ले

अलिकडच्या काही महिन्यांत युक्रेनने रशियन तेल शुद्धीकरण कारखाने, टर्मिनल्स तसंच ऊर्जा पायाभूत सुविधांवर वरच्यावर हल्ले केले आहे. सीएनएननुसार, रशियाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी युक्रेन असं हल्ल्याचे हत्यार उपसल्याचं बोलं जातंय. हे हल्ले लांब पल्ल्याचे आणि प्रगत तंत्रज्ञान असलेल्या ड्रोनच्या मदतीने करण्यात येत असून याआधी मार्चमध्येही युक्रेनने रशियाच्या 3 रिफायनरींना लक्ष्य केलं होतं. 

अमेरिकेकडून युक्रेनला मदत 

अमेरिकन काँग्रेसने युक्रेनला आर्थिक मदत देण्याचे विधेयक मंजूर करण्यात आलं असून अमेरिकेकडून सुमारे 5 लाख कोटी रुपयांची मदत युक्रेनला देण्यात येणार आहे. यातील 1 लाख 91 हजार कोटी रुपये अमेरिकन शस्त्रास्त्रे आणि सुविधा पुरवण्यासाठी असणार आहे. याशिवाय या भागातील अमेरिकन लष्करी कारवायांसाठी 91 हजार कोटी रुपयांचा निधीही देण्यात येणार आहे. युक्रेनला प्रगत तंत्रज्ञानासह शस्त्रे खरेदी करण्यासाठी बिलामध्ये समाविष्ट केलेले सुमारे 1 लाख 16 हजार कोटी रुपये देण्यात आलेय.