RPF मध्ये 4 हजारहून अधिक पदांची भरती, दहावी ते पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज

Indian Railway Recruitment 2024: आरपीएसएफअंतर्गत सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल पदांची भरती केली जाणार आहे.

Pravin Dabholkar | Updated: Apr 15, 2024, 04:22 PM IST
RPF मध्ये 4 हजारहून अधिक पदांची भरती, दहावी ते पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज title=
India Railway Recruitment

Indian Railway Recruitment 2024: भारतीय रेल्वेचे जाळे देशभरात पसरले आहे. दररोज लाखो प्रवासी या सुविधेचा लाभ घेतात. या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारीदेखील तितकीच महत्वाची असते. याच पार्श्वभूमीवर रेल्वेमध्ये शेकडो पदांची भरती केली जाणार आहे. भारतीय रेल्वेअंतर्गत नोकरी मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पदाचा तपशील, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डने रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजेच आरपीएफ आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशन फोर्स म्हणजे आरपीएसएफअंतर्गत सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी 14 एप्रिल रोजी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून 15 एप्रिलपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. आरआरबी आरपीएफच्या या रिक्त पदांसाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज करता येणार नाहीत. केवळ ऑनलाइन माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यासाठी रेलवे रिक्रूटमेंट बोर्डची अधिकृत वेबसाइट rpf.indianrailways.gov.in वर जावे लागेल. येथे जाऊन तुम्हाला पदानुसार मागितलेली माहिती भरावी लागेल. 

शेवटची तारीख 

आरआरबी आरपीएफच्या या रिक्त पदांसाठी आजपासून (15 एप्रिल) अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवारांना नोंदणीसाठी साधारण 1 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. नोटिफिकेशन आणि अर्जाची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट ड्राइव्हच्या माध्यमातून एकूण 4660 रिक्त पदे भरली जाणार आहे. यातील 4208 पदे कॉन्स्टेबलची आहेत. तर उरलेली 452 पदे सब इन्स्पेक्टरची आहेत. यासाठी कोण उमेदवार अर्ज करु शकतात, याची माहिती घेऊया. 

पात्रता 

सब इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.  सब इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 20 वर्षे तर कमाल वय 28 वर्षे इतके असावे. कॉन्स्टेबल पदासाठी दहावी किंवा त्या समकक्ष उमेदवार अर्ज करु शकतात. कॉन्स्टेबल पदासाठी उमेदवाराचे किमान वय 18 तर कमाल वय 28 वर्षे इतके असावे.

कशी होईल निवड?

निवड प्रक्रियेच्या माध्यमातून उमेदवारांची भरती केली जाणार आहे. यासाठी उमेदवाराला निवडीच्या विविध टप्प्यावरील परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. ऑनलाइन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (सीबीटी), फिजिकल एफिशियन्सी टेस्ट, फिजिकल मेजरमेंट टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यामाध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल. या स्टेप्स पूर्ण केलेल्या उमेदवाराची निवड केली जाणार आहे. 

किती असेल शुल्क?

या पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 500 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. एससी, एसटी, एक्स सर्व्हिसमन, महिला उमेदवार आणि ईबीसी कॅटेगरीतील उमेदवारांकडून 250 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

किती मिळेल पगार?

सब इन्स्पेक्टर पदावर निवड झालेल्या उमेदवारांना 35 हजार 400 रुपयापर्यंत पगार दिला जाणार आहे. तर कॉन्स्टेबल पदावर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 21 हजार 700 रुपये पगार दिला जाणार आहे. यासोबत त्यांना इतर सुविधादेखील मिळणार आहे. 

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पगाराचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा