Indian Railway हाकेला धावली; पुण्याहून सर्वाधिक मागणी असणाऱ्या 'या' मार्गांसाठी 'समर स्पेशल' ट्रेनची सोय

Indian Railway Summer Special train : समर स्पेशल ट्रेननं आता उन्हाळी सुट्टीत मनसोक्त फिरा... भारतीय रेल्वेकडून पुन्हा एकदा प्रवाशांसाठी खास भेट...  

सायली पाटील | Updated: Apr 26, 2024, 02:58 PM IST
Indian Railway हाकेला धावली; पुण्याहून सर्वाधिक मागणी असणाऱ्या 'या' मार्गांसाठी 'समर स्पेशल' ट्रेनची सोय  title=
Indian railway summer special trains from pune to Danapur and Gorakhpur north india know the list

Indian Railway : एकिकडे कोकण रेल्वेनं (Konkan Railway) पावसाळी वेळापत्रक जारी केलं नसल्यामुळं मध्य रेल्वेच्या संकेतस्थळावरील संकेतानं अनेक प्रवाशांचा गोंधळ उडवलेला असतानाच दुसरीकडे उन्हाळी सुट्ट्यांच्या निमित्त अपेक्षित स्थळी पोहोचण्यासाठी रेल्वे तिकीटाचं आरक्षण करण्यासाठी अनेकांचीच लगबग पाहायला मिळत आहे. फक्त कोकणच नव्हे, तर राज्याच्या कानाकोपऱ्यात आणि देशाच्या विविध भागांमध्ये सध्या सुट्ट्यांचा माहोल असल्यामुळं शहरी भागांमध्ये असणाऱ्या अनेक मंडळींचे पाय मूळ गावखेड्यांच्या दिशेनं वळले आहेत. 

शहरी भागांमध्येही नोकरीनिमित्त असणारी मूळ घरी जाण्याच्यासाठीचे मार्ग शोधत आहेत. अशा सर्व मंडळींसाठी पुन्हा एकदा भारतीय रेल्वे तारणहार ठरली आहे. सध्या रेल्वे विभागाकडून प्रवाशांचा एकंदर कल पाहता समर स्पेशल ट्रेन अर्थात विशेष उन्हाळी रेल्वेगाड्या सोडण्यावर भर दिला जात आहे. ज्याअंतर्गत राज्याच्या विविध मार्गांनंतर आता पुण्याहून उत्तर भारतात जाण्यासाठी रेल्वेनं Summer Special Trains ची सोय केली आहे. 

हेसुद्धा वाचा : Indian Railway : काय सांगता? कोकणात जाणाऱ्या वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस रद्द?

 

सद्यस्थितीला असणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता आणि उन्हाळी सुट्ट्यांसह लग्नसराईचे दिवस, निवडणुकांचा माहोल पाहता रेल्वे विभागानं उत्तर भारतातील गोरखपूर आणि दानापूर दिशेनं जाणाऱ्या विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या मार्गावरील रेल्वेंसाठी आरक्षण प्रक्रिया रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरु होत आहे. (Indian railway summer special trains from pune to Danapur and Gorakhpur north india know the list )

पुण्याहून गोरखपूरसाठी दोन विशेष फेऱ्या 

पुणे-गोरखपूर विशेष गाडी क्रमांक 01411, 27 एप्रिल रोजी पुण्याहून सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी निघून गोरखपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी 2.50 वाजता पोहोचेल. तर, गाडी क्रमांक 01412 गोरखपूर पुणे 28 एप्रिलला गोरखपूरहून सायंकाळी 6.20 वाजता निघून पुण्याला तिसऱ्या दिवशी 6.40 वाजता पोहोचेल. 

संपूर्ण प्रवासात ही रेल्वे (पुणे- गोरखपूर दिशेनं प्रवासादरम्यान) हडपसर, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना राणी लक्मीबाई झाशी जंक्शन, ओरई, कानपूर, लखनऊ, गोंडा आणि बस्ती या स्थानकावर थांबेल. 

पुणे- दानापूर- पुणे मार्गावर 27 एप्रिलला पुण्याहून गाडी क्रमांक 01013 सायंकाळी 7.55 वाजता निघून दानापूरला तिसऱ्या दिवशी दुपारी 4.30 वाजता पोहोचेल. 01014 ही गाडी 29 एप्रिलला सकाळी साडेसहा वाजता दानापूरहून निघून पुण्याला तिसऱ्या दिवशी सायंकाळी 5.35 वाजता पोहोचेल. 

या प्रवासात ही रेल्वे दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, मणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दिनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा या स्थानकांवर थांबेल.