10 कोटींच्या गाड्या, 7 कोटींचं सोनं, 217.11 कोटींचे बाँड; भाजपा उमेदवाराकडे तब्बल 1400 कोटींची संपत्ती, कोण आहे ही उमेदवार?

LokSabha: भाजपाने (BJP) दक्षिण गोव्यातून व्यावसायिक श्रीनिवास डेम्पो (Shrinivas Dempo) यांची पत्नी पल्लवी डेम्पो (Pallavi Dempo) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पल्लवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिली आहे. त्यांचा संपत्तीचा आकडा अनेकांना चक्रावून टाकणारा आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 17, 2024, 06:48 PM IST
10 कोटींच्या गाड्या, 7 कोटींचं सोनं, 217.11 कोटींचे बाँड; भाजपा उमेदवाराकडे तब्बल 1400 कोटींची संपत्ती, कोण आहे ही उमेदवार? title=

LokSabha: भाजपाने (BJP) दक्षिण गोव्यातून व्यावसायिक श्रीनिवास डेम्पो (Shrinivas Dempo) यांची पत्नी पल्लवी डेम्पो (Pallavi Dempo) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पल्लवी डेम्पो यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी उमेदवारी अर्ज सोपवला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यावेळी त्यांच्यासह उपस्थित होते. पल्लवी डेम्पो यांनी 119 पानांच्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती दिली आहे. यामध्ये पल्लवी डेम्पो आणि श्रीनिवास डेम्पो यांची एकूण 1400 कोटींची संपत्ती असल्याचं उघड झालं आहे. डेम्पो ग्रुप फुटबॉल लिग फ्रँचाईजी, रिअल इस्टेट, जहाज निर्मिती, शिक्षण आणि खोदकाम असा अनेक व्यवसायात सहभागी आहे. 

पल्लवी डेम्पो यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे एकूण 255.4 कोटींची जंगम मालमत्ता आहे. तर श्रीनिवास यांची एकूण 994.8 कोटींची संपत्ती आहे. पल्लवी डेम्पो यांच्या जंगम मालमत्तेचं बाजारमूल्य 28.2 कोटी आहे. तर श्रीनिवास यांच्या जंगम मालमत्तेचं बाजारमूल्य 83.2 कोटी आहे. 

श्रीनिवास डेम्पो यांची गोवा आणि देशातील अनेक ठिकाणी संपत्ती आहे. फक्त देशच नाही दुबईतही त्यांचं एक अपार्टमेंट आहे. ज्याचं बाजारमूल्य सध्या 2.5 कोटी आहे. याशिवाय लंडनमध्येही त्यांचं 10 कोटींचं अपार्टमेंट आहे. 

2.5 कोटींच्या 4 गाड्या

पल्लवी यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनसार, त्यांच्याकडे वेगवेगळ्या सीरिजच्या 3 मर्सिडीज बेंज कार आहेत. ज्यांची किंमत अनुक्रमे 1.69 कोटी, 16.42 लाख आणि 21.73 लाख आहे. त्यांच्याकडे एक कॅडिलेक कारही आहे, जिची किंमत 30 लाख रुपये आहे. महिंद्रा थार असून त्याची किंमत 16.26 लाख आहे. 

पल्लवी यांनी प्रतिज्ञापत्रात सांगितल्यानुसार, त्याच्याकडे 5.7 कोटींचं सोनं आहे. पल्लवी यांनी आर्थिक वर्ष 2022-23 साठी 10 कोटींचा आयकर परतावा भरला आहे. तर श्रीनिवास यांनी 11 कोटींचा आयटी रिटर्न दाखल केला आहे. 

217.11 कोटींचं बाँड

पल्लवी यांच्याकडे 217.11 कोटींचे बाँड, 12.92 कोटींचे सेव्हिंग आणि 9.75 कोटी मूल्याच्या इतर गोष्टीही आहेत. उत्तर आणि दक्षिण गोव्यात तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. पल्लवी यांच्यासह भाजपाचे उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपद नाईक यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.