Election Live Updates: रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे उमेदवार? 19 एप्रिलला भरणार अर्ज

Loksabha Election 2024 Live Updates: पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने प्रचारसभांचा जोर पाहायला मिळणार आहे. तसेच राज्यातील इतर मतदारसंघांमधील नियोजन आणि आढावा बैठकींचं सत्रही आज सुरु असणार आहे. दिवसभरातील घडामोडींवर संक्षिप्त स्वरुपात घेतलेला आढावा...

Election Live Updates: रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे उमेदवार? 19 एप्रिलला भरणार अर्ज

Loksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार असून आज पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा सायंकाळी 5 वाजता थंडावणार आहेत. देशात एकूण 21 राज्यांमध्ये 102 मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 5 मतदारसंघाचा समावेश आहे. ज्यात नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर हे पाच मतदारसंघ आहे. आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत अनेक बड्या नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. तसेच देशातील अन्य 20 राज्यांमध्येही प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहेत. दिवसभरातील घडामोडींवर आपण या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून नजर टाकणार आहोत.

17 Apr 2024, 18:12 वाजता

आज पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या... नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक आणि भंडारा -गोंदियातील प्रचार आज संपला.. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय...तर देशात 21 राज्यात 102 जागांसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे...प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी जोमाने प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रचारसभा महाराष्ट्रात झाल्या.

17 Apr 2024, 16:34 वाजता

धाराशिवमध्ये मनीषा राखुंडे-पाटलांच्या घरावर हल्ला झाला आहे.  राखुंडे पाटील या शरदचंद्र पक्षाच्या महिला पदाधिकारी आहेत. हल्ल्यातून मनीषा राखुंडे-पाटील थोडक्यात बचावल्या आहेत. त्यांच्या वाहनांची तोडफोड करून हल्लेखोर फरार झाले आहेत. 

17 Apr 2024, 16:18 वाजता

गडकरींवर विकास ठाकरेंनी साधला निशाणा

नागपूर : विकास ठाकरे यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुद्दे लोकसभा निवडणुकीत दिसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ही लोकसभेची निवडणूक आहे. महानगर पालिकेच्या निवडणुकीत मुद्दे उपस्थित व्हावे ते मुद्दे लोकसभा निवडणुकीत दिसत आहेत, असं विकास ठाकरे म्हणाले आहेत. लोकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवलं आहे. मतदारसंघात चांगल्या शाळा नाहीच, आरोग्य केंद्र नाहीत, विजेचे बिल भरमसाट वाढले आहे. विविध समाजाला न्याय देण्याच कामही झालेलं नाही. तानाशाही,आणि हिटलरशाही पद्धतीने पक्ष उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. विरोधकच संपवायचे काम चालू आहे. मागील 10 वर्षांमधील आश्वासने पूर्ण केली नाही म्हणून पक्ष फोडण्यात आलेत, असा टोला विकास ठाकरेंनी लगावला आहे. विकास ठाकरेंनी नितीन गडकरींवर निशाणा साधताना, 'मतं मागायला जाणार नाही असे आधी असे म्हणायचे नंतर आता मतं मागायची,' असं म्हटलं आहे.

17 Apr 2024, 15:47 वाजता

ईशान्य मुंबईसाठी उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सेनाभवन येथे ईशान्य मुंबईतील पदाधिका-यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. ईशान्य मुंबई उमेदवार संजय दिना पाटील आणि पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

17 Apr 2024, 15:44 वाजता

राज ठाकरेंनी जाहीर केली समन्वयकांची यादी

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लेाकसभा निवडणूकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याच्या घेतलेल्या भूमिकेला धरून राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांसाठी राज ठाकरेंच्या आदेशानुसार पक्षाचे नेते व सरचिटणीस यांची मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अमित ठाकरेंकडे पुण्याची समन्वयक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ठाण्याची जबाबदारी अभिजित पानसेरेंवर सोपवण्यात आली आहे. तर पालघरची जबाबदारी अविनाश जाधव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. भिवंडी / कल्याणची जबाबदारी राजू पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

17 Apr 2024, 15:36 वाजता

MIM Support To VBA | Asaduddin Owaisi यांनी Prakash Ambedkar यांना लोकसभेसाठी दिला पाठिंबा

निवडणुकीसंदर्भातील लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

17 Apr 2024, 14:43 वाजता

'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वाद

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडू (Ajit Pawar) भेटीगाठीचं सत्र सुरु आहे. बुधवारी अजित पवार यांनी इंदापूरातील डॉक्टर, वकिल आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला. पण यावेळी अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद (Controversy) उफाळून येण्याची शक्यता आहे. सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

17 Apr 2024, 14:07 वाजता

माझ्यामुळे पक्ष आहे म्हणणारे...; महाजनांचा खडसेंना टोला

एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेश करणार असे स्पष्टपणे सांगितले आहे. तरी देखील भाजपाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर जळगाव येथे आयोजित महायुतीच्या मेळाव्यातून टीका केली आहे. "मी मी म्हणणारे चालत नाही. ज्यांचे पुण्य संपले तेच या पक्षातून बाहेर पडले आहे. आता बघा तुमचा भविष्यकाळ. ते, मी मी म्हणणारे होते त्यांचे काय झालं तुम्ही बघितलं. 35-35 वर्ष आमदारकी भोगली 20- 20 वर्ष लाल दिव्याच्या गाडीत फिरले. माझ्यामुळे पक्ष मी हाय म्हणून पक्ष अशा अविर्भावात फिरणारे लोक आता कुठे थप्पीवर जाऊन पडले आहेत," असं महाजन म्हणाले. उन्मेष पाटील यांच्यावर टीका करताना मंत्री गिरीश महाजन यांचं नाव न घेता एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

17 Apr 2024, 14:04 वाजता

Mumbai | Anil Desai यांच्या प्रचारकडे Congress ने फिरवली पाठ, सांगलीनंतर मुंबईतही काँग्रेस नाराज

निवडणुकीसंदर्भातील लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

17 Apr 2024, 14:02 वाजता

'एका व्यक्तीची इच्छा..'; संविधान बदलण्यासाठी 'रामायण' फेम गोवील यांचा पाठिंबा?

मध्य प्रदेशमधील फैजाबादमधील विद्यमान खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार लालू सिंह यांनी भारतीय संविधानात बदल करण्यासंदर्भात केलेल्या विधानावरुन चांगलाच वाद निर्माण झाला आहे. असं असतानाच आता भाजपाचे मेरठ मतदारसंघातील उमेदवार आणि रामायण मालिकेमुळे घराघरात पोहचलेले ज्येष्ठ अभिनेते अरुण गोवील यांच्या विधानामुळे या वादात पुन्हा नव्याने भर पडल्याचं दिसत आहे. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त...