Election Live Updates: रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे उमेदवार? 19 एप्रिलला भरणार अर्ज

Loksabha Election 2024 Live Updates: पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने प्रचारसभांचा जोर पाहायला मिळणार आहे. तसेच राज्यातील इतर मतदारसंघांमधील नियोजन आणि आढावा बैठकींचं सत्रही आज सुरु असणार आहे. दिवसभरातील घडामोडींवर संक्षिप्त स्वरुपात घेतलेला आढावा...

Election Live Updates: रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे उमेदवार? 19 एप्रिलला भरणार अर्ज

Loksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार असून आज पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा सायंकाळी 5 वाजता थंडावणार आहेत. देशात एकूण 21 राज्यांमध्ये 102 मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 5 मतदारसंघाचा समावेश आहे. ज्यात नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर हे पाच मतदारसंघ आहे. आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत अनेक बड्या नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. तसेच देशातील अन्य 20 राज्यांमध्येही प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहेत. दिवसभरातील घडामोडींवर आपण या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून नजर टाकणार आहोत.

17 Apr 2024, 13:56 वाजता

रत्नागिरी - सिंधुदुर्ग आणि संभाजीनगर तिढा सुटला

निवडणुकीसंदर्भातील लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

17 Apr 2024, 13:52 वाजता

मविआला 35 तर इंडिया आघाडीला देशात 305 जागा मिळतील: राऊत

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी 35 जागा जिंकेल अशा विश्वास व्यक्त केला आहे. देशात इंडिया आघाडी यशस्वी होईल असं सांगताना राऊत यांनी थेट किती जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून येतील याबद्दलचं भाकित केलं आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 35 आणि देशात 'इंडिया आघाडी'ला 305 जागा मिळतील, असं राऊत म्हणाले आहेत.

17 Apr 2024, 13:11 वाजता

रामटेकमध्ये CM शिंदेंच्या रोड-शोला सुरुवात;  कापणार 4 किमीपर्यंतचं अंतर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रामटेक लोकसभा मतदारसंघात उमरेड येथे रोडशो सुरू आहे. शिवसेना उमेदवार राजू पारवे यांच्या समर्थनासाठी उमरेड येथील गांगापुर चौकातून हा रोड-शो सुरु झाला आहे. प्रचाराच्या तोफा थंड होण्याच्या काही तासआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामटेक लोकसभा मतदारसंघात करताय रोड-शो करत आहेत. हा रोड-शो 3 ते 4 किलोमीटरपर्यंतचं अंतर पार करणार आहे.

17 Apr 2024, 13:05 वाजता

'फडणवीसांना आकडे लावण्याची सवय, सर्व्हेची आकडेवारी मान्य नाही; आम्हीच जिंकणार'; राऊतांचा हल्लाबोल

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सर्वेक्षणाच्या आकडेवारीशी आपण सहमत नसल्याचं सांगतानाच महाविकास आघाडीला नक्कीच यश मिळेल असं मत व्यक्त केलं आहे. "पहिल्या टप्प्यात आमचे उमेदवार नाहीत, पण महाविकास आघडीचे उमेदवार आहेत. कुणी काहीही म्हणू द्या, कितीही सर्व्हे येऊ द्या परिवर्तनांची सुरुवात ही विदर्भातून होते. लोक पक्ष नाही तर महाविकास आघाडीचा उमेदवार बघत आहेत. रामटेकमध्ये आमचा उमेदवार नाही पण महाविकास आघाडीसाठी मी बैठक घेत आहे. निवडणूकीला हळूहळू रंग चढत जाईल, जे सर्व्हे येत आहेत त्याबाबद्दल आम्ही सहमत नाही. आम्हाला महाराष्ट्र शंभर टक्के यश मिळेल. देवेंद्र फडणवीस जे सांगत आहे. 45+ त्याचे आकडे काहीही असू द्या त्यांना आकडे लावण्याची सवय आहे. निवडणूकीनंतर त्यांना आकडे लावण्याच्या धंद्यात पडावे लागेल," असा टोला संजय राऊथ यांनी लगावला आहे.

17 Apr 2024, 12:25 वाजता

पुण्यात अमित ठाकरे- मोहोळ भेट

महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरेंची भेट घेणार आहेत. अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असून याच दौऱ्यादरम्यान दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. मनसेच्या शहर कार्यालयामध्ये दुपारी दीडच्या सुमारास ही भेट हेणार आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघांमध्ये घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे.

17 Apr 2024, 12:21 वाजता

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान कधी? कुठे? कोणत्या नेत्यांचं भविष्य मतपेटीत होणार कैद?

देशाच्या आणि राज्याच्या राजकारणाला वळण देणारी लोकसभा निवडणूक तोंडावर आली असून, अवघ्या काही तासांतच या निवडणुकीअंतर्गत पहिल्या टप्प्य़ातील मतदान पार पडणार आहे. सध्या सर्वत्र या टप्प्याच्या अनुषंगानं अखेरच्या क्षणी प्रचारसभा सुरु असून, बुधवारी सायंकाळपर्यंत सर्व पक्षांचा प्रचार थांबणार आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान कधी? कुठे? कोणत्या नेत्यांचं भविष्य मतपेटीत होणार कैद? जाणून घ्या येथे क्लिक करुन...

17 Apr 2024, 12:10 वाजता

'अजित पवारांनी भरलं होतं बारचं बिल'

रघुनाथ राजे नाईक-निंबाळकर यांनी आपल्या कॉलेज जीवनातील एक किस्सा सांगितला."1982 साली कॉलेजमधील निवडणुकीत स्टेफिन बारमध्ये 11 हजारांचं बिल केलं होतं. ते भरायला आमच्याकडे पैसे नव्हते. पण ते बिल अजित पवारांनी भरले," असं रघुनाथ राजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितलं. अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार त्यावेळेस आमच्या सोबत होते म्हणून अजित पवारांनी हे बिल भरलं, असं रघुनाथ राजे नाईक-निंबाळकर म्हणाले. कॉलेज जीवनातील हा पार्टीचा किस्सा रघुनाथ राजे नाईक-निंबाळकर यांनी जाहीर कार्यक्रमात बिनधास्तपणे सांगितला. 

17 Apr 2024, 11:58 वाजता

मी तोतया नाईक-निंबाळकर नाही

फलटणच्या रघुनाथ राजे नाईक-निंबाळकर यांनी भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. "मी तोतया नाईक-निंबाळकर नाही. मी मुधोजी मनमोहन राजवाड्यातील अनभिषिक्त राजाचा नातू आहे," असं रघुनाथ राजे नाईक-निंबाळकर म्हणाले आहेत.

17 Apr 2024, 11:57 वाजता

नंदूरबारमध्ये काँग्रेस करणार जोरदार शक्तीप्रदर्शन

काँग्रेस लोकसभेचे उमेदवार गोवाल पाडवी 23 एप्रिला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसचे अनेक नेते उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, सतीश पाटील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या अर्ज भरण्याच्यानिमित्ताने काँग्रेस नंदुरबार शहरात जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असून विजयासाठी सर्वस्व प्रयत्न काँग्रेसकडून केले जात आहेत. काँग्रेसने ऐनवेळी नवीन उमेदवार दिल्याने अनेक नेते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेस जिल्ह्यात आपली ताकद दाखवण्याच्या प्रयत्न या निमित्ताने करणार आहे. नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसच्या बालेकिल्ला राहिला असून यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्न करताना दिसून येत आहे.

17 Apr 2024, 09:56 वाजता

काँग्रेसला एकमेव मतदारसंघ राखता येणार का?

पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये सर्वांचे लक्ष लागले आहे ते चंद्रपूर मतदारसंघावर! येथे सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर याच्यात थेट लढतत होणार आहे. 2019 मध्ये महाराष्ट्रातील केवळ चंद्रपूरची एकमेव जागा काँग्रेसकडे होती. त्यामुळे काँग्रेस आपला हा बालेकिल्ला राहणार का हे देखील पाहावे लागणार आहे.