Election Live Updates: रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे उमेदवार? 19 एप्रिलला भरणार अर्ज

Loksabha Election 2024 Live Updates: पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने प्रचारसभांचा जोर पाहायला मिळणार आहे. तसेच राज्यातील इतर मतदारसंघांमधील नियोजन आणि आढावा बैठकींचं सत्रही आज सुरु असणार आहे. दिवसभरातील घडामोडींवर संक्षिप्त स्वरुपात घेतलेला आढावा...

Election Live Updates: रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे उमेदवार? 19 एप्रिलला भरणार अर्ज

Loksabha Election 2024 Live Updates: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी होणार असून आज पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा सायंकाळी 5 वाजता थंडावणार आहेत. देशात एकूण 21 राज्यांमध्ये 102 मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 5 मतदारसंघाचा समावेश आहे. ज्यात नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर हे पाच मतदारसंघ आहे. आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत अनेक बड्या नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. तसेच देशातील अन्य 20 राज्यांमध्येही प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळणार आहेत. दिवसभरातील घडामोडींवर आपण या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून नजर टाकणार आहोत.

17 Apr 2024, 09:31 वाजता

एकनाथ खडसेंना जीवे मारण्याची धमकी

Eknath Khadse Death Threat : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरु असताना राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं खळबळजनक वृत्त नुकतंच समोर आलं. खडसे यांना चार वेगवेगळ्या मोबाईलवरुन धमकीचे फोन आले. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त...

17 Apr 2024, 09:31 वाजता

कोल्हेंचा जीभेवरील ताबा सुटतोय; आढळराव पाटलांचा टोला

'पलटी सम्राट'पेक्षा नटसम्राट बरा म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावर निशाण साधला होता. या टीकेवर आता महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटलांनी कोल्हे यांच्यावर टीका केली आहे. "अमोल कोल्हे केव्हा काय बोलतील याचा नेम नसून कोल्हे यांना आता बरळायची सवय लागली आहे. अजित पवारांवर टीका करणे हा कोल्हेंचा प्रसिध्दी मिळवण्याचा डाव असून त्यांना पराभव दिसत असल्याने त्यांचा जिभेवरील ताबा सुटत चालला आहे," असा टोला आढळराव पाटलांनी लगावला.

17 Apr 2024, 09:23 वाजता

पहिल्या टप्प्यात गडकरींचं भविष्य मतपेटीत होणार कैद

पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील प्रचाराला संध्याकाळी 5 वाजता संपणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रतील विदर्भातील पाच जागेवर 19 तारखेला मतदान होणार आहे. भाजपचे जेष्ठ नेते नितीन गडकरींचं भविष्य 19 तारखेला मतपेटीत कैद होणार आहे.

17 Apr 2024, 08:44 वाजता

जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही; तटकरेंचा गीतेंना इशारा

रायगडकर संकटात होते तेव्हा तुम्ही कुठं होतात? असा सवाल विरोधक रायगडमधील इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांना विचारत आहेत. याबाबत विचारले असता अनंत गीते यांनी हा मुद्दा हसण्यावारी नेला. 'या टीकेची दखल घ्यावीशी वाटत नाही,' असं अनंत गीते म्हणाले. गीते यांच्या हसण्याचा महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे. 'जनतेवर जेव्हा संकट येतं आणि त्याबाबत पत्रकारांच्या प्रश्नावर तुम्ही हसताय ही जनतेची क्रूर चेष्टा आहे. आता जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,' असा इशारा तटकरे यांनी गीतेंना दिला आहे.

17 Apr 2024, 08:31 वाजता

पहिल्या टप्प्यात गडकरींचं भविष्य मतपेटीत होणार कैद

पहिल्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील प्रचाराला संध्याकाळी 5 वाजता संपणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रतील विदर्भातील पाच जागेवर 19 तारखेला मतदान होणार आहे. भाजपचे जेष्ठ नेते नितीन गडकरींचं भविष्य 19 तारखेला मतपेटीत कैद होणार आहे.

17 Apr 2024, 08:31 वाजता

काँग्रेसला एकमेव मतदारसंघ राखता येणार का?

पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये सर्वांचे लक्ष लागले आहे ते चंद्रपूर मतदारसंघावर! येथे सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर याच्यात थेट लढतत होणार आहे. 2019 मध्ये महाराष्ट्रातील केवळ चंद्रपूरची एकमेव जागा काँग्रेसकडे होती. त्यामुळे काँग्रेस आपला हा बालेकिल्ला राहणार का हे देखील पाहावे लागणार आहे.

17 Apr 2024, 08:27 वाजता

माढामध्ये पवार वाढवणार भाजपाचं टेन्शन

शरद पवार यांनी धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांना आज भेटीला बोलवलं आहे. सकाळी 8 वाजता पुण्यात जानकर शरद पवारांना भेटले असून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. या भेटीमध्ये माढाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील ही उपस्थित असणार आहेत. उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील एकत्र आल्यास माढा मध्ये भाजप मोठ्या संकटात येईल असं चित्र दिसत आहे.

17 Apr 2024, 08:24 वाजता

महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस

पूर्व महाराष्ट्रातील विदर्भामधील 5 मतदारसंघांमधील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे.  नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच मतदारसंघांमध्ये आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.