Action on Gaming Company : 600 ऑनलाईन गेमिंग कंपन्यांवर कारवाई

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Action on Gaming Company : 600 ऑनलाईन गेमिंग कंपन्यांवर कारवाई

29 Mar 2024, 10:36 वाजता

वसंत मोरे आज घेणार प्रकाश आंबेडकर यांची भेट

 

Vasant More : वसंत मोरे वंचितकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. आज मुंबईत ते वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची भेट घेणारेत. काल पिंपरीत वंचितच्या प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली होती. आता आज ते थेट मुंबईत येऊन आंबेडकरांशी चर्चा करतील. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 Mar 2024, 10:06 वाजता

रोहित पवारांची अजित पवारांवर टीका

 

Rohit Pawar On Ajit Pawar : भाजपसोबत जाण्याच्या अजित पवारांच्या भूमिकेवर रोहित पवारांनी जोरदार टीका केलीय. अजित पवार पूर्वी कमळाबाईबद्दल लय भारी बोलायचे, आता वेगळं बोलतात.. लोकं आपली भूमिका कशी काय बदलतात..? असा टोला रोहित पवारांनी लगावलाय. राज ठाकरेंच्या लाव रे तो व्हिडीओ भूमिकेवरुनही त्यांनी चिमटा काढलाय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा 

29 Mar 2024, 09:51 वाजता

नवनीत राणांचा प्रचार करणार नाही - अभिजीत अडसूळ

 

Amravati Abhijit Adsul : खासदार नवनीत राणा यांना भाजपने उमेदवारी दिल्याने महायुतीत नाराजी नाट्य पाहायला मिळतंय... अभिजीत अडसूळांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली असून मुख्यमंत्र्यांनी सांगीतलं तरीही राणांचा प्रचार करणार नाही असं ते म्हणालेत..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 Mar 2024, 09:38 वाजता

खेड-शिवापूर टोलनाका दरात वाढ

 

Khed-Shivapur Toll Plaza Price Hike : पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूरच्या टोलच्या दरात वाढ करण्यात आलीय. 1 एप्रिलपासून सुमारे अडीच टक्क्यांनी टोलवसुली वाढणार आहे.. यासंबंधी ठेकेदार टोल रोड प्रशासनाकडून पत्रक काढण्यात आलंय. जीप आणि हलक्या वाहनांसाठीच्या टोलच्या दरात 5 रुपयांची वाढ होणार आहे, व्यावसायिक वाहनांच्या दरातही 5 रुपयांची वाढ होणार आहे.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 Mar 2024, 08:32 वाजता

सोन्याचे दर 70 हजार पार

 

Gold Rate Hike : सोन्याच्या दरात आजपर्यंत उच्चांकी दरवाढ झालीय...सोन्याचे दर 70 हजारी पार झालेयत...गेल्या 24 तासांत सोन्याच्या दरात दोन हजार रुपयांनी वाढ झालीय...आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी आणि गुंतवणुकीत वाढ झाल्याने सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झालीय...त्यामुळे सोन्याचे आजचे भाव जीएसटीसह 70 हजार 100 रुपये प्रतितोळे इतका आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 Mar 2024, 08:08 वाजता

बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता

 

Bacchu Kadu : अमरावतीतून नवनीत राणांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय...आमदार बच्चू कडू आज महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे...दुपारी 1 वाजता प्रहार पक्षाच्या उमेदवाराची घोषणा करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय...यावेळी कडू उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत...उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे अमरावतीचे सहसंपर्क प्रमुख दिनेश बुब यांना प्रहार उमेदवारी देणार असल्याची माहिती आहे...दिनेश बुब यांना उमेदवारी देण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मेळावे घेतले होते...मात्र, ठाकरे गटाकडून उमेदवारी न मिळाल्याने दिनेश बुब नाराज असल्याचीही माहिती आहे...आज एक वाजता बच्चू कडू आणि दिनेश बुब संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 Mar 2024, 07:54 वाजता

प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा

 

Praful Patel : एअर इंडिया प्रकरणात प्रफुल्ल पटेलांना मोठा दिलासा मिळालाय. एअर इंडिया-इंडियन एअरलाईन्स विलिनीकरण गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट सादर केलाय. पुराव्यांअभावी क्लोजर रिपोर्ट सादर करत असल्यानं सीबीआयनं विशेष कोर्टात म्हटलंय. 2017 मध्ये सीबीआयनं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार याप्रकरणी चौकशी सुरु केली होती. यूपीए काळात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री असणा-या प्रफुल्ल पटेलांवर एअर इंडिया गैरव्यवहारप्रकरणात आरोप करण्यात आले होते. याप्रकरणातील मध्यस्थ दिपक तलवारचे प्रफुल्ल पटेलांशी घनिष्ठ संबंध असल्याचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर पटेलांची ईडी आणि सीबीआय चौकशी झाली होती.. मात्र आता सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट सादर केलाय.. महायुतीत प्रवेश केल्याच्या 8 महिन्यांनंतर पटेलांना  हा दिलासा मिळाल्यानं चर्चांना उधाण आलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 Mar 2024, 07:51 वाजता

शरद पवार आज सातारा दौऱ्यावर

 

Sharad Pawar : शरद पवार आज सातारा दौ-यावर आहेत. सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठकीला ते हजेरी लावणार आहेत. दोन्ही मतदारसंघात उमेदवार निश्चित करण्यासाठी चर्चा होणार आहे. माढातून रणजितसिंह निंबाळकरांना भाजपनं उमेदवारी दिल्यामुळे मोहिते-पाटील कुटुंब नाराज आहे. ते राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा आहे तर साता-यात उदयनराजे भाजपकडून इच्छुक आहेत.. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळते याची उत्सुकता आहे..

बातमीचा व्हिडीओ पाहा -