Action on Gaming Company : 600 ऑनलाईन गेमिंग कंपन्यांवर कारवाई

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Action on Gaming Company : 600 ऑनलाईन गेमिंग कंपन्यांवर कारवाई

29 Mar 2024, 23:37 वाजता

नोंदणीकृत नसलेल्या ऑनलाईन गेमिंग कंपन्या होणार बंद

 

Action on Gaming Company : नोंदणीकृत नसलेल्या ऑफशोर गेमिंग कंपन्यांवर जीएसटी अधिका-यांनी धडक कारवाई केलीय... डीजीजीआय या जीएसटी विभागातल्या DGGI या तपास विभागानं तब्बल 600 बिगर नोंदणीकृत ऑफशोर गेमिंग कंपन्यांची यादी तयार केलीय.. या विभागानं केंद्रीय आयटी मंत्रालयाला पत्र लिहून या कंपन्यांच्या वेबसाईट बंद करण्याची शिफारस केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. आतापर्यंत 60 हून अधिक गेमिंग कंपन्यांच्या युआरएल लिंक बंद केल्यात... भारतात ऑनलाईन गेमिंगसाठी रजिस्ट्रेशन गरजेचं आहे. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर बंदीची कारवाई सुरू झालीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

29 Mar 2024, 22:36 वाजता

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून निलेश राणे - फडणवीसांची भेट?

 

Nilesh Rane Meet Fadanvis : भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणेंनी सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.. जवळपास 20 मिनिटांच्या भेटीनंतर निलेश राणे बाहेर निघाले.. ही सदिच्छा भेट असल्याचं निलेश राणेंनी सांगितलंय. मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरुन भाजप आणि शिवसेनेत तिढा आहे... रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा भाजपला मिळावी अशी निलेश राणे यांची मागणी आहे.. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून किरण सामंत या जागेसाठी आग्रही आहेत... आज किरण सामंत यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी प्रयत्न केला.. तेव्हा महायुतीत रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा कोणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणारेय.

29 Mar 2024, 19:25 वाजता

मंत्री उदय सामंत आणि त्यांचे भाऊ किरण सामंत मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला

 

Uday Samant,Kiran Samant - CM Shinde Meet : ठाण्यातून मोठी बातमी समोर येतेय.. मंत्री उदय सामंत आणि त्यांचे भाऊ किरण सामंत मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.. किरण सामंत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत.. तर दुसरीकडे भाजपनेही याच जागेचा आग्रह धरलाय.. त्याचसंदर्भात उदय सामंत आणि किरण सामंत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत.. खासदार श्रीकांत शिंदे आधी किरण सामंत यांच्यासोबत चर्चा करतील.. त्यानंतर किरण सामंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतील.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

29 Mar 2024, 17:07 वाजता

दिंडोरीत अजित पवार गटाला मोठा धक्का

 

Gokul Zirwal join Sharad Pawar's group? : विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.. त्यामुळे दिंडोरीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय.. गोकुळ झिरवाळ हे नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव आहेत.. शरद पवार गटाच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांनी दिंडोरीतून उमेदवारी मागितलीय... ते लवकरच शरद पवारांची भेट घेण्याचीही शक्यता आहे.. मात्र गोकुळ झिरवाळ सध्या नॉट रिचेबल आहेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

29 Mar 2024, 14:08 वाजता

मुंबईतील 5 जागा ठाकरे गट लढवणार - संजय राऊत

 

Sanjay Raut : मुंबईतील 6 पैकी 5 जागा लढण्यावर ठाकरे गट ठाम आहे...पालघर, हातकणंगले, कल्याणप्रमाणे मुंबईतील 5 जागाही आमच्याच आहेत...त्यामुळे सर्व उमेदवारांची आम्ही नावं जाहीर करू असं राऊतांनी म्हटलंय...त्यामुळे शिवसेना ठाकरे गट मुंबईतील 5 जागा लढणार असल्याची खासदार संजय राऊत यांनी दिलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 Mar 2024, 13:22 वाजता

राणा हरणार ही काळ्या दगडावरची रेष - बच्चू कडू

 

Bacchu Kadu On Navneet Rana : ब्रह्मदेव आला तरी नवनीत राणा निवडून येऊ शकत नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.. असं म्हणत बच्चू कडूंनी चांगलंच डिवचलंय.. नवनीत राणांना भाजपनं उमेदवारी दिल्यानं बच्चू कडू चांगलेच आक्रमक झालेत.. त्यांनी पुन्हा राणांना आव्हान दिलंय.. 

29 Mar 2024, 12:53 वाजता

खासदार श्रीनिवास पाटील यांची निवडणुकीतून माघार

 

Shrinivas Patil : साता-याचे खासदार श्रीनिवास पाटलांनी निवडणुकीतून माघार घेतलीय...तब्येतीचे कारण देत पाटलांनी उमेदवारी नाकारलीय...कार्यकर्त्यांकडून शरद पवारांनी निवडणूक लढवावी अशी मागणी केलीय...यासोबतच आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील मानेंच्या नावाचीदेखील चर्चा आहे...सातारा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी पवारांनी बैठक बोलावलीय...या बैठकीत निर्णय झाल्यानंतर सातारा आणि माढ्याच्या उमेदवारीबाबत निर्णय होणार आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 Mar 2024, 12:04 वाजता

ठाणे-कल्याण डोंबिवली जागा आम्ही जिंकणार - संजय राऊत

 

Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचा कल्याण-डोंबिवली आणि पालघरचा उमेदवार उद्या जाहीर होणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिलीय...यावेळी ठाणे जिल्ह्यातील सर्व जागा आम्ही जिंकू असा विश्वास राऊतांनी व्यक्त केलाय...तर शिंदे गटाचा ठाणे, कल्याण, पालघरचा उमेदवार जाहीर न झाल्याने फुटलेला गट हा भाजपसोबत धुणीभांडी करतोय अशी टीका राऊतांनी केलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 Mar 2024, 11:36 वाजता

मविआची 3 एप्रिल रोजी पत्रकार परिषद

 

MVA Press Conference : महाविकास आघाडीची महत्त्वाची पत्रकार परिषद 3 एप्रिल होणार आहे.. मुंबईतल्या शिवालय इथे ही पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, नाना पटोले आणि मित्रपक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

29 Mar 2024, 10:40 वाजता

विजय करंजकर निवडणूक लढवण्याच्या तयारीत

 

Nashik Vijay Karanjkar : नाशिकचे ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत...नाशिकमधून ठाकरे गटाने उमेदवारी नाकारल्याने करंजकर नाराज आहेत...उद्या उद्धव ठाकरेंची भेट घेऊन ते निर्णय घेणार आहेत...याआधी त्यांनी फेसबुक पोस्ट लिहून नाराजी व्यक्त केलीय...'मे जब जब बिखरा हू, दुग्नी रफ्तार से निखरा हू' अशा आशयाची पोस्ट लिहिलीय...या पोस्टसोबत बाळासाहेब ठाकरे, आदित्य आणि उद्धव ठाकरेंचा फोटो आहे...यावेळी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय राऊतांचा फोटो पोस्ट मधून गायब आहे...करंजकरांचा राग संजय राऊतांवर असल्याची चर्चा असतांनाच या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी राऊतांना इशारा दिलाय...नाशिकमधून राजाभाऊ वाजे हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत...

बातमीचा व्हिडीओ पाहा -