Maharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE: कोकणात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार; रत्नागिरीत उद्धव ठाकरे यांची भव्य सभा

Maharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE Updates: महाराष्ट्रात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. राज्यातील आठ मतदारसंघातील प्रत्येक लाइव्ह अपडेट्स

Maharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE: कोकणात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार; रत्नागिरीत उद्धव ठाकरे यांची भव्य सभा

Maharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE: लोकसभा निवडणुक एकूण सात टप्प्यात होत आहे. त्यातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आजे देशात दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. महाराष्ट्रातील 8 मतदारसंघात आज मतदान होत आहे. या टप्प्यात आज अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य पणाला लागणार आहे. आज होणाऱ्या मतदानाचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या.

26 Apr 2024, 14:55 वाजता

अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघात दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी ३१.०५ टक्के मतदान पार पडले. लोकसभा मतदारसंघनिहाय मतदान- 
05 बुलढाणा -29.7 %, 06- अकोला -33.25%, 07- अमरावती -31.41 %, 14- यवतमाळ-वाशिम 31.47 %. 

26 Apr 2024, 14:11 वाजता

अकोला शहरातील सिव्हिल लाईन रोड स्थित विद्यामंदिर कन्या शाळेमधील व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याने या ठिकाणची मतदान प्रक्रिया काही काळा करिता खोळंबली होती, सदरची व्हीव्हीपॅट मशीन ही मतदान केंद्र क्रमांक 218 मधील असून याबाबत निवडणूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती पडतात त्यांनी तात्काळ मतदान केंद्रावर पोचून बिघाड झालेली व्हीव्हीपॅट मशीन बदलून दुसरी मशीन या ठिकाणी कार्यान्वित केली..या नंतर मतदान सुरळीत सुरू झालं.

26 Apr 2024, 13:39 वाजता

मुंबई कॅाग्रेस अध्यक्ष आणि उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या कॅांग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहचल्या आहेत. कालच वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबई मधून काँग्रेसकडून तिकीट जाहीर करण्यात आले आहे.

26 Apr 2024, 13:12 वाजता

सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगडमध्ये दाखल....पेण येथील नगर पालिका मैदानावर प्रचार सभेचे आयोजन...सुनील तटकरे, पालकमंत्री उदय सामंत, आमदार महेंद्र दळवी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र थोरवे उपस्थित

26 Apr 2024, 12:45 वाजता

Lok Sabha Election Phase 2: 29 एप्रिलला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची सोलापुरात जाहीर सभा होणार आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी शरद पवार,  उद्धव ठाकरे यांची सभा होईल. तर, त्याच दिवशी म्हणजे येत्या 29 तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सोलापुरात  राम सातपुते यांच्यासाठी सभा पार पडणार आहे. सोलापुरात एकाच दिवशी तीन मोठे नेते सोलापुरात सभा घेणार असल्याने सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

 

26 Apr 2024, 12:31 वाजता

Lok Sabha Election Phase 2: दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत असताना जवळपास 88 जागांवर हे मतदान होत आहे विदर्भात आणि महाराष्ट्रात आठ जागेवर मतदान होत आहे. यादरम्यान, ईव्हीएम बंद पडण्याच्या अनेक तक्रारी आलेले आहेत त्यामुळे मतदार निराश होताना दिसत आहेत अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली. या मशीन बंद कशा पडतात? असा सवाल करत, यामागे षडयंत्र आहे.... असा प्रश्नही त्यांनी वारंवार उपस्थित केला. 

 

26 Apr 2024, 12:19 वाजता

Lok Sabha Election Phase 2: निवडणूक आयोगाकडून अजित पवारांना ‘क्लीनचिट’. इंदापूरमधील सभेत बोलताना अजित पवार यांनी विकास निधी हवा असेल तर उमेदवाराच्या चिन्हासमोरील ‘कचाकचा बटण दाबा’ अन्यथा विकासनिधी देताना आपला हात आखडेल असे वक्तव्य केल होते. ‘कचाकचा बटण दाबा’ यावर राशपकडून आक्षेप घेण्यात आला होता.  या व्यक्तव्याची तक्रार त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. 

26 Apr 2024, 12:01 वाजता

Lok Sabha Election Phase 2: मतदानाची आतापर्यंतची आकडेवारी टक्क्यांमध्ये 

महाराष्ट्र - आकडेवारी - 18.83 %

वर्धा - 18.35 %
अकोला - - 17.37%
अमरावती - 17.73%
बुलढाणा - 17.92%
हिंगोली - 18.19%
नांदेड - 20.85%
परभणी - 21.77%
यवतमाळ-वाशिम - 18.01

26 Apr 2024, 11:59 वाजता

Lok Sabha Election Phase 2: नाशिकमध्ये महायुतीकडून इच्छुक असलेले स्वामी शांतिगिरी महाराज यांनी घेतला उमेदवारी अर्ज. स्वामी शांतिगिरी महाराज यांचे प्रतिनिधी अर्ज घेण्यासाठी आले होते. 29 तारखेला स्वामी शांतिगिरी महाराज उमेदवारी अर्ज दाखल करणार असून छगन भुजबळांचे सहकारी असलेले दिलीप खैरे यांच्यानंतर महायुतीकडून इच्छुक असलेले शांतिगिरी महाराज यांनी नाशिकसाठी अर्ज घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. 

 

26 Apr 2024, 11:34 वाजता

Lok Sabha Election Phase 2: या वेळेला पाडणारे बना आणि अशा ताकदीनं पाडा की त्याच्या पाच पीडा उभ्या नाही राहिल्या पाहिजे असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हंटलंय. मनोज जरांगे पाटील यांनी आज मतदान करत लोकशाहीचा हक्क बजावलाय. परभणी लोकसभा मतदारसंघात गोरी गंधारी या गावात जरांगे पाटलांनी मतदान केलं. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. मतदान करताना समाज आणि आपले लेकरं डोळ्यासमोर ठेवून मतदान करावं. सगे सोयरे शब्दाच्या अमंलबजावणीच्या बाजूनं मतदान करावं . यावेळेस पाडणारे बना मात्र 6 जूनपर्यंत सरकारनं आपक्षण दिलं नाही तर मग देणारे बनू असं जरांगे पाटील यांनी म्हंटलंय. दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज प्रकाश आंबेडकर यांना सहकार्य करावं त्याचबरोबर छत्रपतींच्या दोनही गाधींचा समाजानं सन्मान करावा असं जरांगे पाटील यांनी म्हंटलंय.