Maharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE: कोकणात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार; रत्नागिरीत उद्धव ठाकरे यांची भव्य सभा

Maharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE Updates: महाराष्ट्रात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. राज्यातील आठ मतदारसंघातील प्रत्येक लाइव्ह अपडेट्स

Maharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE: कोकणात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार; रत्नागिरीत उद्धव ठाकरे यांची भव्य सभा

Maharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE: लोकसभा निवडणुक एकूण सात टप्प्यात होत आहे. त्यातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आजे देशात दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. महाराष्ट्रातील 8 मतदारसंघात आज मतदान होत आहे. या टप्प्यात आज अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य पणाला लागणार आहे. आज होणाऱ्या मतदानाचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या.

26 Apr 2024, 20:41 वाजता

कोकणात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे.  रत्नागिरीत उद्धव ठाकरे यांची भव्य सभा होणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत यांच्या विरोधात महायुतीकडून भाजपचे उमेदवार नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची रत्नागिरी जाहीर सभा होणार आहे.  28 एप्रिलला ही सभा होणार आहे. 

26 Apr 2024, 19:47 वाजता

Maharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE : देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात दुस-या टप्प्यात देखील कमी मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे... देशातील 89 मतदारसंघात 64.24 टक्के मतदानाची नोंद झालीय... तर राज्यातील ८ मतदारसंघात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 53.51 टक्के मतदान झालंय.. वर्धा लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक, तर सर्वात कमी मतदान हिंगोलीत झालंय..

26 Apr 2024, 19:01 वाजता

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदानाची वेळ संपली असून या ठिकाणी दुपारी पाच वाजेपर्यंत 49.46% मतदानाची नोंद झाली होती. अजूनही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा आहेत, त्यामुळे सुमारे 65% पर्यंत मतदान होईल असा अंदाज बांधला जात आहे. राळेगाव व दिग्रस विधानसभा क्षेत्रात दुपारपर्यंत मतदानाची सर्वाधिक नोंद होती. मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदार मतदान केंद्रावर आहेत.

26 Apr 2024, 17:41 वाजता

Maharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील आठ जागांवर मतदान पार पडतंय.  संध्याकाळी पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रात 53.51 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. 

वर्धा – 56.66
अकोला – 52.49
अमरावती – 54.50
बुलडाणा – 52.24
हिंगोली – 52.03
नांदेड – 52.47
परभणी – 53.79
यवतमाळ-वाशिम – 54.04

26 Apr 2024, 16:54 वाजता

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज अखेर वैध....अनेक अपक्ष उमेदवारांनी घेतले होते निवडणूक अर्जावरती आक्षेप....महाविकास आघाडीला शिरूर लोकसभा मतदार संघात मोठा दिलासा...2016 ला ओवेसींच्या पुण्यातील सभेला विरोध केल्याचा गुन्हा दाखल असल्याचा करण्यात आला होता विरोधकांकडून आक्षेप...मात्र या गुन्ह्या बाबत उमेदवाराला कोणती माहिती किंवा पत्रच प्राप्त नसल्याने उमेदवाराला गुन्ह्याची कल्पनाच नसल्याने उमेदवाराकडून स्पष्टीकरून..

26 Apr 2024, 16:13 वाजता

Maharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील आठ जागांवर मतदार पार पडतंय. दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी समोर आली आहे. 

वर्धा - 45.95 टक्के
अकोला - 42.69 टक्के
अमरावती - 43.76 टक्के
बुलढाणा -  41 टक्के
हिंगोली -  40.50 टक्के
नांदेड -  42.42 टक्के
परभणी -44.49 टक्के
यवतमाळ - वाशिम - 42.55 टक्के

26 Apr 2024, 16:05 वाजता

29 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यातील रेस कोर्स मैदनावर सभा.अमित ठाकरे या सभेला येणार, ते मंचावर असतील. राज ठाकरे यांच्यासंदर्भात चर्चा नाही.

26 Apr 2024, 15:40 वाजता

ठाकरे गटाचे दक्षिण मुंबई लोकसभा आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघांचे दोन्ही उमेदवार 29 एप्रिलला भरणार आपला उमेदवारी अर्ज..दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत आणि दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाई ओल्ड कस्टम हाऊस येथे 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देखील उपस्थित राहतील.

26 Apr 2024, 15:13 वाजता

जे पी गावित नाशिक लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकार्यालय दाखल...जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शन.. नाशिक लोकसभा मतदारसंघाचा भरला उमेदवारी अर्ज...

26 Apr 2024, 15:13 वाजता

दुपारी 3पर्यंत मतदानाची टक्केवारी. 

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
वर्धा - 45.95 टक्के, अकोला -42.69 टक्के, अमरावती - 43.76टक्के, बुलढाणा -  41,66 टक्के, हिंगोली -  40.50 टक्के, नांदेड -  42.42 टक्के, परभणी -44.49 टक्के, यवतमाळ - वाशिम -42.55 टक्के