Maharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE: कोकणात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार; रत्नागिरीत उद्धव ठाकरे यांची भव्य सभा

Maharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE Updates: महाराष्ट्रात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. राज्यातील आठ मतदारसंघातील प्रत्येक लाइव्ह अपडेट्स

Maharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE: कोकणात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार; रत्नागिरीत उद्धव ठाकरे यांची भव्य सभा

Maharashtra Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE: लोकसभा निवडणुक एकूण सात टप्प्यात होत आहे. त्यातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आजे देशात दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. महाराष्ट्रातील 8 मतदारसंघात आज मतदान होत आहे. या टप्प्यात आज अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य पणाला लागणार आहे. आज होणाऱ्या मतदानाचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या.

26 Apr 2024, 09:17 वाजता

Lok Sabha Election Phase 2: हिंगोली लोकसभेच्या मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली आहे हिंगोलीतील कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

26 Apr 2024, 08:34 वाजता

Lok Sabha Election Phase 2: यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील ह्या आज नांदेड येथे मतदानाचा हक्क बजावणार आहे, तत्पूर्वी त्यांनी यवतमाळ येथील आपल्या माहेरी देवांची पूजा केली.

26 Apr 2024, 08:19 वाजता

Lok Sabha Election Phase 2: बच्चू कडू यांनी बजावला मतदानाचा हक्क

 

26 Apr 2024, 08:13 वाजता

Lok Sabha Election Phase 2: माहुर तालुक्यातील मौजे टाकळी येथे एक तासापासून ईव्हीएम मशीन बंद.

मतदान सुरू झाल्यानंतर एक मतदान झाले पण त्यांनतर मशीन बंद पडली. एक तासापासून मशीन बंद असून मतदार ताटकळत उभे राहिले आहेत. पर्यायी मतदान यंत्र उपलब्ध करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.

26 Apr 2024, 08:07 वाजता

Lok Sabha Election Phase 2: यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी दिग्रस तालुक्यातील चिंचोली या आपल्या गावी मतदानकेंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळची निवडणूक ही जनतेने हाती घेतली असल्याने हुकूमशाही विरोधात मतदान होईल व जनता देशात परिवर्तन घडवेल असे संजय देशमुख यांनी सांगितले.

26 Apr 2024, 08:04 वाजता

Lok Sabha Election Phase 2: अमरावती शहरातील रूक्मिणी नगर शाळा क्रमांक 19मध्ये इव्हीएममध्ये बिघाड

दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून आज अमरावतीत मतदार मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी बाहेर पडत आहे. मात्र अमरावती शहरातील रूक्मिणी नगर शाळायेथील 19 नंबर च्या मनपा शाळेत मतदान सुरू होताच एका खोलीत मतदान यंत्रात मध्ये बिघाड झाल्याने अर्धा तास मतदानाची प्रक्रिया खोळंबली असल्याचे पाहायला मिळाले 

26 Apr 2024, 08:03 वाजता

Lok Sabha Election Phase 2: भाजपचे उमेदवार रामदास तडस यांनी केले सपत्नीक मतदान

दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज होणार आहेय .त्यासाठी सकाळी 7 वाजता पासून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांनी केले सपत्नीक सहपरिवार मतदान केले आहे.

26 Apr 2024, 08:01 वाजता

Lok Sabha Election Phase 2:  माजी राज्यमंत्री डी पी सावंत यांनी केले मतदान 

अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक आणि मित्र माजी मंत्री डी पी सावंत यांनी कुटुंबासह मतदान केले. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती ठीक नाही. तरी त्यांनी आवर्जून मतदान केले आहे.

26 Apr 2024, 07:25 वाजता

Lok Sabha Election Phase 2: मतदानाला सुरुवात, मात्र परभणीतील ईव्हीएम मशीन बंद, मतदानप्रक्रिया खोळंबली

परभणी शहरातील महात्मा फुले महाविद्यालयातील 172 मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन सात वाजल्यापासून बंद पडले आहे. मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सकाळी सुरू होणार मतदान खोळंबल आहे,, सदर मशीन तांत्रिक कारणे बंद पडली असून 45 मिनिटांपासून मतदान प्रक्रिया थांबली आहे.

26 Apr 2024, 07:18 वाजता

Lok Sabha Election Phase 2: मतदानावर अवकाळी पावसाचे सावट 

अमरावती लोकसभा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. अमरावती मतदारसंघात एकूण 18 लाख 36 हजार 078 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी 1 हजार 983 मतदान केंद्र असणार आहे. अमरावती मध्यें 37 उमेदवार निवडणूक रिंगणात असून यात भाजपच्या नवनीत राणा, काँग्रेसचे बळवंत वानखडे व प्रहारचे दिनेश बुब यांच्यात यांच्यात लढत होणार आहे. दरम्यान आजच्या मतदानावर अवकाळी पावसाचे सावट असल्याचे पाहायला मिळत आहे.