Liver Damage: रात्री शरीरात 'हे' बदल दिसल्यास दुर्लक्ष करू नका; यकृत खराब होण्याची आहेत लक्षणं

चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे यकृताच्या समस्या होण्याची शक्यता असते. जर यकृताच्या समस्या असतील तर काही लक्षणे रात्री दिसून येतात. 

| Apr 20, 2024, 11:30 AM IST
1/6

जर तुम्हाला यकृताच्या समस्या दिसत असतील तर शरीरात काही बदल दिसून येऊ शकतात.

2/6

जाणून घेऊया यकृत खराब झाल्यानंतर रात्रीच्या वेळेस कोणती लक्षणं दिसून येतात.

3/6

रात्री अचानक त्वचेला खाज सुटणं आणि जळजळ होणं यासारखी लक्षणं यकृताशी संबंधित समस्यांची लक्षणे असू शकतात.  त्यामुळे याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

4/6

रात्री, जर शरीरातील बहुतेकदा रक्त यकृतामध्ये जमा होऊ लागतं. अशावेळी त्याचा आकार वाढू लागतो आणि दाब वाढतो. 

5/6

यकृताच्या समस्येच्या सुरुवातीला पाय आणि घोट्याला सूज येऊ शकते. ही लक्षणे रात्री दिसल्यास सावध राहावं.

6/6

यकृताच्या नुकसानीमुळे बिलीरुबिनची पातळी अचानक वाढते. त्यामुळे किडनीमध्ये स्राव होऊ लागतो. त्यामुळे लघवीचा रंग बदलतो.