PHOTO : लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र मोदींनी विमानातून पाहिला सूर्यतिलक सोहळा, त्यांच्या एका कृतीनं वेधलं लक्ष

लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सूर्यतिलक सोहळा पाहण्यासाठी अयोध्येत जाऊ शकलं नाही. पण त्यांनी विमानातून या क्षणाचे साक्षीदार झाले. 

Apr 17, 2024, 14:37 PM IST
1/7

पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममधील नलबारीमधील जाहीर सभा झाल्यानंतर विमानातून परताना मोदी अद्भूत सूर्यतिकल क्षण पाहिला. 

2/7

जानेवारी महिन्यात अयोध्येतील मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर प्रथमच रामनवमीला मोठा सोहळा आज पार पडला. 

3/7

भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत हँडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हा सोहळा पाहत असल्याचे फोटो शेअर करण्यात आलेय. 

4/7

या फोटोमध्ये विमानात बसून टॅबवर सूर्यतिलक सोहळा पाहत असल्याचे दोन फोटो दिसत आहेत. 

5/7

या फोटोमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका कृत्याने सर्वांचं भुवया उंचावल्या. 

6/7

तुम्ही हे फोटो नीट पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की, टॅबवर सूर्यतिलक पाहत असताना पंतप्रधान मोदींनी पायातील चपल काढल्याच दिसत आहे. 

7/7

श्रीप्रभू यांच्या प्रती मोदींनी दाखवलेल्या भक्तीभाव पाहून नेटकरी कौतुक करत आहेत.