लग्न, गृहप्रवेश ते नामकरण...अक्षय्य तृतीयासह मे महिन्यात शुभ मुहूर्त किती आणि कधी?

May 2024 Shubh Muhurat : हिंदू धर्मात शुभ कार्य हे मुहूर्त पाहून केलं जातं. शुभ कार्य हे शुभ मुहूर्तावर केल्यास देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो, अशी हिंदू धर्मात मान्यता आहे. अशात मे महिन्यात तुम्ही शुभ कार्य करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या शुभ मुहूर्ताची संपूर्ण लिस्ट 

Apr 27, 2024, 13:07 PM IST
1/8

मे महिन्यात अक्षय्य तृतीयासह अनेक शुभ मुहूर्त आहेत. अक्षय्य तृतीया 10 मे रोजी असणार आहे. हिंदू धर्मात हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. 

2/8

त्याशिवाय हिंदू धर्मात सर्वार्थ सिद्धी योग हा शुभ मानला जातो. मे महिन्यात 05, 07, 08, 13, 14, 19, 23, 24 आणि 26 तारखेला सर्वार्थ सिद्धी योग असणार आहे. 

3/8

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अमृत ​​सिद्धी योग हा देखील शुभ मुहूर्त आहे. 7 आणि 19 मे रोजी अमृत ​​सिद्धी योग असणार आहे. 

4/8

मे महिन्यात जर तुम्हाला वाहन आणि मालमत्ता खरेदी करायची असेल तर अक्षय्य तृतीयासह 01, 03, 05, 06, 12, 13, 19, 20, 23, 24, 29 आणि 30 मे हे शुभ दिवस आहेत. 

5/8

घर खरेदीसाठी शुभ दिवस - 03,04, 12, 13, 17, 22,23 आणि 24 मे हे शुभ असणार आहे. 

6/8

नामकरण मुहूर्त  - 01, 03, 05, 09, 10, 13, 19, 20, 23, 24, 27 आणि 30 मे हे दिवस नामकरणाच्या विधीसाठी अतिशय उत्तम आहे. 

7/8

मुंडन मुहूर्त - 03, 10, 24, 29 आणि 30 मे हे मुंडन संस्कारासाठी उत्तम आहेत.

8/8

मे महिन्यात तुम्हाला लग्न आणि गृहप्रवेश करायचा असेल तर तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. कारण मे महिन्यात लग्न आणि गृह प्रवेश करण्यासाठी शुभ मुहूर्त नाहीत.