IPL 2024 RR VS DC Live Update : राजस्ठान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सला दिली 12 धावांनी मात

IPL 2024 : आयपीएल 2024  च्या नवव्या सामन्यात आज संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स आणि ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स आमने सामने आहे.

IPL 2024 RR VS DC Live Update :  राजस्ठान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सला दिली 12 धावांनी मात

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या सतराव्या हंगामात संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स आणि ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स आमने सामने आहेत. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर हा सामना खेळवला जातोय. राजस्थान रॉयल्सने पहिला सामना जिंकत चांगली सुरुवात केलीय. तर दिल्ली कॅपिटल्सला पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. 

 

28 Mar 2024, 21:06 वाजता

 

रियान परागने 16 व्या ओव्हरमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केलेले आहे. या तडाखेदार पाळीत परागने 4 चौकार आणि 4 षटकार लगावून दिल्लीच्या गोलंदाजांचा कस काढलेला आहे, 17 व्या ओव्हरमध्ये राजस्थानचा स्कोर आहे 138-4

28 Mar 2024, 21:03 वाजता

रियान परागने 16 व्या ओव्हरमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केलेले आहे. या तडाखेदार खेळीत परागने 4 चौकार आणि 4 षटकार लगावून दिल्लीच्या गोलंदाजांचा कस काढलेला आहे.

28 Mar 2024, 20:54 वाजता

15 ओव्हरच्या समाप्तीनंतर राजस्थान सध्या चांगल्या स्थितीत दिसतेय. आर आश्विन तडाखेदार फलंदाजी करून 29 वर तंबूत परतला. रियान परागने आता मोर्चा आपल्या हाती घेतलेला आहे आणि दिल्लीच्या गोलंदाजांचा टोल वसूल करायची जबाबदारी घेतली आहे. राजस्थानचा स्कोर 125-3 असा आहे.

28 Mar 2024, 20:01 वाजता

पाच षटकांच्या समाप्तीनंतर राजस्थान रॉयल्सला थोडी हळू सुरूवात मिळालेली आहे आणि राजस्ठानला संजू सॅमसनच्या स्वरूपाच खलील अहमदच्या गोलंदाजीवर दूसरा धक्का सूद्धा लागलेलाय, 5.3 ओव्हर्स पर्यंत राजस्थान रॉयल्सचा स्कोर 30-2 असा आहे. 

28 Mar 2024, 19:19 वाजता

मूकेश कुमारने दूसऱ्या ओव्हरमध्ये यशस्वी जयस्वालला फक्त पाच धावातच तंबूत परत पाठवले. 

28 Mar 2024, 19:10 वाजता

दिल्ली कॅपिटल्स संघ - डेविड वॉर्नर, मिचेल मार्श , रिकी भुई , ऋषभ पंत (विकेटकीपर-कॅप्टन) , ट्रिस्टन स्टब्स ,  अक्षर पटेल , सुमित कुमार , कुलदीप यादव , एनरिक नॉर्खिया , खलील अहमद , मुकेश कुमार 

राजस्थान रॉयल्स संघ - यशस्वी जायसवाल, जॉस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर-कॅप्टन), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, संदीप शर्मा, आवेश खान

 

28 Mar 2024, 19:07 वाजता

IPL 2024 RR VS DC Live Update 
आयपीएलच्या नवव्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने सामने आहेत. या सामन्यासाठी दिल्ली कॅपिटल्सने संघात दोन बदल केले आहेत. शाय होप आणि ईशांत शर्माला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर बसवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी एन्रीच नोर्किया आणि मुकेश कुमारला संधी देण्यात आली आहे. तर राजस्थान रॉयल्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.