KKR vs RCB Live Score, IPL 2024: आरसीबीविरूद्ध केकेआरने 7 विकेट्सने सामना जिंकला

Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru Live Score in Marathi: इंडियन प्रिमिअर लीगमध्ये आज एक महत्त्वाचा समाना होणार आहे. 

KKR vs RCB Live Score, IPL 2024: आरसीबीविरूद्ध केकेआरने 7 विकेट्सने सामना जिंकला

Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru Live Score in Marathi: इंडियन प्रिमिअर लीगमध्ये आज एक महत्त्वाचा समाना होणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्सचा संघासमोर फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ मैदनात उतरेल. बंगळुरुमधील एम. चिन्नस्वामी स्टेडियमवर असलेला हा संघ आरसीबीसाठी होम ग्राऊण्डवरील सामना असणार आहे.

29 Mar 2024, 20:34 वाजता

15 व्या ओव्हरनंतर आरसीबीचा स्कोर 134-3 आहे. ग्लेन मॅक्सवेल सूनील नरेनच्या बॉलिंगवर कॅच आउट झालेला आहे, तर विराट कोहलीने एक आरसीबीच्या फलंदाजांची एक बाजू सांभाळून ठेवली आहे.

29 Mar 2024, 20:21 वाजता

वरूण चक्रवर्तीच्या 12 व्या ओव्हरमध्ये विराट कोहलीने 36 बॉलमध्ये 3 छक्के आणि 2 चौकांच्या मदतीने आपलं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे आणि आरसीबीच्या स्कोरला 12 ओव्हरनंतर 104-2 पर्यंत पोहोचवले आहे.

29 Mar 2024, 20:14 वाजता

10 व्या ओव्हरनंतर विराट कोहली 42 वर नॉट आऊट असून दूसऱ्या विकेटनंतर ग्लेन मॅक्सवेल मैदानावर आलेला आहे. आरसीबीचा स्कोर 10 ओव्हरच्या समाप्तीस 85-2 आहे.

29 Mar 2024, 20:10 वाजता

9 व्या ओव्हरमध्ये कॅमेरन ग्रीनच्या स्वरूपात आरसीबीला दूसरा धक्का लागलेला आहे. आंद्रे रसेलने ग्रीनला क्लिन बोल्ड केलं. 9 व्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आरसीबीचा स्कोर 82-2 असा होता.

29 Mar 2024, 19:53 वाजता

पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर आरसीबीने फाफ डू प्लेसिसत्या रूपात एक महत्वाची विकेट गमावलेली आहे. सावध सुरूवातीनंतर आरसीबीची स्थिती 46-1 अशी आहे. 

29 Mar 2024, 19:42 वाजता

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूला दूसऱ्या ओव्हरीत मोठा फटका बसलेला आहे, हर्षित राणाच्या बॉलिंगवर फाफ डू प्लेसिसने आपली विकेट गमावलेली आहे. 2 ओव्हरनंतर आरसीबी ची स्थिती 17-1 अशी आहे.

29 Mar 2024, 19:11 वाजता

RCB XI -

फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), वेंकटेश ऐयर, श्रेयस ऐयर (कर्णधार), रमनदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरिन, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्थी

KKR XI -

विराट कोहली, फाफ डु प्लेसी (कर्णधार), कॅमरन ग्रीन, राजत पटिदार, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, अल्जारी जोसेफ, मयंक दागर, मोहम्मद सिराज, यश दयाल

29 Mar 2024, 19:07 वाजता

RCB vs KKR toss update :

कोलकत्ता नाईट रायडर्सचा कॅप्टन श्रेयस अय्यरने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

29 Mar 2024, 18:56 वाजता

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि कोलकत्ता यांच्यातील हेड-टू-हेड प्रदर्शन बघितले तर, दोघं संघ एकूण 32 सामने खेळले आहेत आणि यामधून कोलकत्याने 18 सामन्यात आपलं वर्चस्व दाखवले आहे तर बंगळूरू 14 मॅचेस जिंकण्यात यशस्वी झालेले आहे. 

29 Mar 2024, 18:49 वाजता

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू आणि कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात होणारा आजचा सामना हा बंगळूरूच्या होमग्राऊंड म्हणजेच एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आयपीएल 2024 मध्ये दोघं संघ आतापर्यंत एक मॅच जिंकण्यात यशस्वी झाले आहेत. तर आजच्या मॅचमध्ये बघणंयोग्य असेल की, कोण बाजी मारणार?