KKR vs RCB Live Score, IPL 2024: आरसीबीविरूद्ध केकेआरने 7 विकेट्सने सामना जिंकला

Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru Live Score in Marathi: इंडियन प्रिमिअर लीगमध्ये आज एक महत्त्वाचा समाना होणार आहे. 

KKR vs RCB Live Score, IPL 2024: आरसीबीविरूद्ध केकेआरने 7 विकेट्सने सामना जिंकला

Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bengaluru Live Score in Marathi: इंडियन प्रिमिअर लीगमध्ये आज एक महत्त्वाचा समाना होणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्सचा संघासमोर फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ मैदनात उतरेल. बंगळुरुमधील एम. चिन्नस्वामी स्टेडियमवर असलेला हा संघ आरसीबीसाठी होम ग्राऊण्डवरील सामना असणार आहे.

29 Mar 2024, 22:49 वाजता

केकेआरने 17 व्या ओव्हरीत श्रेयस अय्यरच्या षटकाने आरसीबीविरूद्ध एकतर्फा सामना जिंकला.

29 Mar 2024, 22:42 वाजता

16 व्या ओव्हरमध्ये वेंकटेश अय्यरच्या रूपात तिसरा धक्का बसलेला आहे. यश दयालने वेंकटेशच्या फलंदाजीच्या तूफानाला थांबवले. 16 ओव्हर अखेरीस केकेआरचा स्कोर 176-3 होता

29 Mar 2024, 22:35 वाजता

वेंकटेश आणि श्रेयस अय्यरच्या भागीदारीमूळे केकेआर मजबूत स्थितीत दिसत आहे. वेंकटेशने 15 व्या ओव्हरमध्ये आपले अर्धशतकसूद्धा पूर्ण केले.  15 ओव्हरच्या समाप्तीनंतर कोलकत्याचा स्कोर 167-2 असा आहे.

29 Mar 2024, 22:07 वाजता

केकेआर सध्या मजबूत स्थितीत दिसत आहे. श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर मैदानावर बॅटिंगसाठी आले आहेत, तर 10 ओव्हरनंतर केकेआरचा स्कोर 112-2 असा आहे. 

29 Mar 2024, 22:02 वाजता

8 व्या ओव्हरमध्ये फिलीप सॉल्ट हा तंबूत परतला, विजयकूमारने फिलीपला 30 धावांवर कॅच आऊट केले आहे.

29 Mar 2024, 21:53 वाजता

सातव्या ओव्हरमध्ये मयंक डागरने केकेआरला पहिला धक्का दिलेला आहे, सूनील नरेनला 47 वर बोल्ड करत आरसीबाला मोकळा श्वास घेण्याची संधी दिलेली आहे

29 Mar 2024, 21:44 वाजता

केकेआरचे फलंदाज सूनील नरेन आणि फिलीप सॉल्ट यांने टीमला ताबडतोब सुरूवात दिलेली आहे. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर आहे 64-0.

29 Mar 2024, 21:06 वाजता

आरसीबीने 20 ओव्हर्सच्या समाप्तीनंतर कोलकत्याला 183 धावा करण्याचे आव्हान दिलेले आहे. आरसीबीकडून विराट कोहलीने चमकदार कामगिरीकडून 4 चौके आणि 4 षटकांच्या मदतीने 83 उत्कृष्ट खेळी करत केकेआरच्या गोलंदाजांचे हाल बेहाल केले आहेत, तर कोहली सोबत कॅमेरन ग्रीन याने 33, ग्लेन मॅक्सवेल याने 28 आणि दिनेश कार्तिकने शेवटमध्ये येऊन फक्त 8 बॉलमध्ये 20 धावांची ताबडतोब खेळी खेळली आहे. तर कोलकत्याकडून हर्षित राणा आणि आंद्रे रसल यांच्या खात्यात प्रत्येकी दोन तर सूनील नरेनच्या खात्यात एक विकेट आहे. बघण्यायोग्य गोष्ट असेल की केकेआरच्या धाकड फलंदाजीसमोर बंगळूरूचे गोलंदाज आपल्या घरच्या मैदानावर वर्चस्व दाखवू शकतात की नाही? 

29 Mar 2024, 20:53 वाजता

हर्षित राणाच्या 18 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर अनूज रावतला आऊट केले आहे. 18 व्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आरसीबीचा स्कोर 153-5 असा आहे. 

29 Mar 2024, 20:47 वाजता

17 व्या ओव्हरमध्ये आरसीबीने रजत पाटीदारच्या स्वरूपात चौथी विकेट गमावलेली आहे. आंद्रे रसलच्या बॉलिंगवर पाटीदारने बाउंड्रीवर रिंकू सिंगच्या हातात सोपी कॅच दिली.