Rohit Sharma: हार्दिक नाही तर रोहित शर्मा ठरला मुंबईच्या पराभवासाठी जबाबदार; पाहा नेमकं कसं?

Rohit Sharma: चेन्नईच्या सामन्यात रोहित शर्माने या सामन्यात 63 बॉल्समध्ये 105 रन्सची नाबाद खेळी केली. त्याच्या या खेळीनंतर अनेक लोक त्याला हिरो मानतायत. तर दुसरीकडे याच सामन्यात हार्दिक पांड्याने 6 बॉल खेळून केवळ 2 रन्स केले. 

सुरभि जगदीश | Updated: Apr 16, 2024, 11:09 AM IST
Rohit Sharma: हार्दिक नाही तर रोहित शर्मा ठरला मुंबईच्या पराभवासाठी जबाबदार; पाहा नेमकं कसं? title=

Rohit Sharma: रविवारी मुंबईच्या वानखेडे मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यामध्ये 20 रन्सने चेन्नईने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. या पराभवासब मुंबईच्या टीमच्या प्लेऑफ गाठण्याच्या आशाही मावळत चालल्या आहेत. या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 206 रन्स केले होते. मुंबई लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आली तेव्हा रोहित शर्माच्या शतकानंतरही विजय मिळवता आला नाही. अशातच आता मुंबईच्या पराभवाला रोहित शर्माला जबाबदार धरलं जातंय. 

माजी कर्णधार रोहित शर्माचं शतक व्यर्थ

चेन्नईच्या सामन्यात रोहित शर्माने या सामन्यात 63 बॉल्समध्ये 105 रन्सची नाबाद खेळी केली. त्याच्या या खेळीनंतर अनेक लोक त्याला हिरो मानतायत. तर दुसरीकडे याच सामन्यात हार्दिक पांड्याने 6 बॉल खेळून केवळ 2 रन्स केले. यानंतर त्याने आपली विकेट गमावली. या पराभवासाठी चाहते त्याला जबाबदार धरत आहेत. मात्र आता मुंबई इंडियन्सच्या पराभवाचं खरं कारण रोहित शर्मा असल्याची चर्चा रंगली आहे. 

रोहित शर्मामुळे मुंबईच्या टीमवर ओढावली पराभवाची नामुष्की

12व्या ओव्हरपर्यंत मुंबई इंडियन्सचा स्कोर 2 विकेट्स 118 रन्स असा होता. त्यावेळी रोहित शर्मा 43 बॉल्समध्ये 74 रन करून खेळत होता. त्यावेळी टीमला जिंकण्यासाठी शेवटच्या 8 ओव्हरमध्ये 48 बॉल्समध्ये 89 रन्स हवे होते. याशिवाय मुंबईच्या हातात 8 विकेट शिल्लक होत्या. अशा परिस्थितीत जर रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी केली असती तर सामन्याचं चित्र काहीसं वेगळं असतं. 

वानखेडेचं पीच फलंदाजांसाठी उत्तम असल्याचं मानलं जातं. त्यावेळी रोहित 43 बॉल्समध्ये 74 रन्स करून सेट झाला होता. त्यामुळे पुढच्या ओव्हर्समध्ये वेगवान फलंदाजी कर्ण अपेक्षित होतं. मात्र असं असतानाही त्याला त्याच्या डावातील शेवटच्या 20 बॉल्समध्ये केवळ 31 रन्स करता आले.

रोहितने आपल्या डावातील शेवटच्या 6 बॉल्समध्ये 17 रन्स केले. मात्र टीमला ज्यावेळी गरज होती तेव्हा त्याची बॅट शांत असल्याचं दिसून आलं. सुमारे 13व्या ओव्हरपासून ते 18व्या ओव्हरपर्यंत रोहितला रन करणं फार कठीण जात होतं. त्यामुळे या 6 ओव्हर्समध्ये त्याला एकही सिक्स मारता आला नाही. रोहितच्या संथ फलंदाजीमुळे इतर फलंदाजांवर दबाव आला. त्यामुळेच दुसऱ्या टोकाकडून सातत्याने विकेट पडल्या. रोहितने शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये वेगवान फलंदाजी केली, पण टीमला शेवटच्या 12 बॉल्समध्ये 47 रन्सची गरज होती. त्यामुळे अशा परिस्थितीत रोहित शर्माला पराभवासाठी जबाबदार मानलं जातंय.