पॅरिस ऑलिम्पिकला 100 दिवस बाकी, नीरज चोपडा, पीवी सिंधूसह 'हे' खेळाडू ठरले पात्र

Paris Olympics 2024 : खेळाचा कुंभमेळा अर्थात ऑलिम्पिक स्पर्धेला आजपासून बरोबर शंभर दिवसांचा अवधी बाकी राहिला आहे. यंदा 26 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान पॅरिस ऑलिम्पिक पार पडणार आहे. खेळाच्या या मोठ्या इव्हेंटसाठी भारतीय खेळाडू जोरदार तयारी करत आहेत. 

राजीव कासले | Updated: Apr 17, 2024, 07:06 PM IST
पॅरिस ऑलिम्पिकला 100 दिवस बाकी, नीरज चोपडा, पीवी सिंधूसह 'हे' खेळाडू ठरले पात्र title=

Paris Olympics : पॅरिस ऑलिम्पिकचं आयोजन यंदा 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान करण्यात आलं आहे.  खेळाच्या या मोठ्या इव्हेंटसाठी भारतीय खेळाडू (Indian Players) जोरदार तयारी करत आहेत. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणं हे जगभरातील खेळाडूंचं स्वप्न असतं. यासाठी खेळाडू दिवस-रात्र मेहनत करत असतात. यंदा भारतीय खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा आहेत. स्टार भालाफेकपटू नीरज चोपडा (Neeraj Chopra), आघाडीची बॅडमिंटन खेळाडू पीवी सिंधूने (PV Sindhu) पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता पूर्ण केली आहे. 

काही खेळाडूंना अजूनही संधी
नीरज चोपडा, पीवी सिंधूबरोबरच अनेक भारतीय खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) आपली जागा पक्की केली आहे. तर काही खेळाडूंना क्वालीफाय करण्यासाठी अद्यापही संधी आहे. 19 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या एशियाई ऑलिम्पिक क्वालीफायरमध्ये भारतीय कुस्तीपटूंना ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची संधी मिळणार आहे. काही खेळांमध्ये खेळाडूंचा कोटा असतो. तर नेमबाजी आणि कुस्ती या खेळात देशाचा कोटा असतो. देशाला मिळणाऱ्या कोटात खेळाडू बदलले जाऊ शकतात. यासाठी चाचणी स्पर्धा आयोजित केली जाते. 

पॅरिस ऑलिम्पिकसाठी हे खेळाडू पात्र

तीरंदाजी - धीरज बोम्मदेवरा : पुरुष रिकर्व्ह

अ‍ॅथलेटिक्स
नीरज चोपडा : मेन्स जेवलिन थ्रो
किशोर कुमार जेना : मेन्स जेवलिन थ्रो

मुरली श्रीशंकर: मेन्स लॉन्ग जम्प

अविनाश साबळे : मेन्स 3000 मीटर स्टीपलचेज

पारुल चौधरी: वुमन्स 3000 मीटर स्टीपलचेज

प्रियंका गोस्वामी : वुमन्स 20 किमी रेसवॉक

बॅडमिंटन
पीवी सिंधू : वुमेन्स सिंगल्स
अश्विनी पोनप्पा आणि तनीषा क्रॅस्टो: विमेन्स डबल्स.
सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी: मेन्स डबल्स.
एचएस प्रणय : मेन्स सिंगल्स.
लक्ष्य सेन : मेन्स सिंगल्स.

बॉक्सिंग
लवलीना बोर्गोहेन : वुमेन्स 75 kg.
निकहत जरीन : वुमेन्स 50 kg.
परवीन हुडा : वुमेन्स 57 kg.
प्रीति पवार : वुमेन्स 54 kg.

घोडेस्वारी
अनुश अग्रवाल : इंडिविजुअल ड्रेसेज.

हॉकी
हॉकी पुरुष टीम : 2022 एशियाई स्पर्धेत सुवर्ण पद जिंकल्यानंतर थेट पात्र

सेलिंग
विष्णु सरवनन : मेन्स ICLA 7

भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या अडचणीत वाढ
मेन्स 20 किमी रेसवॉकने अॅथलेटिक्स महासंघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. भारताच्या सात खेळाडूंनी ऑलिम्पिकसाठी क्वालीफाय केलं. पण केवळ 3 खेळाडूंनाच पॅरिस ऑलिम्पिकचं तिकिट मिळालं. आता अक्षदीप सिंह, राम बाबू, अर्शप्रीत सिंह, विकास सिंह, परमजीत बिष्ट, सूरज पंवार, सर्विन सेबेस्टियन या सातपैकी कोणत्या तीन खेळाडूंना ऑलम्पिकसाठी पाठवायचं याचा निर्णय भारतीय अॅथलेटिक्स महासंघाला घ्यायचा आहे.