बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही तिच्या कामासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.

करीना कपूरची प्रमुख भूमिका असलेला क्रू हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

आता करीना कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवरुन टांझानिया ट्रीपचे फोटो पोस्ट केले आहेत.

यात करीना ही तिचा मोठा लेक तैमूर खानसोबत जंगल सफाराची आनंद घेताना दिसत आहे.

यावेळी करीना डेनिम शर्ट, जिन्स, सनग्लासेस, शूट असा अंदाजात दिसत आहे.

तर तैमूरने निळ्या रंगाचे शर्ट, ट्राऊजर आणि करड्या रंगाची टोपी परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे.

यावेळी तैमूर हा जीपमध्ये बसून हरिण पाहताना दिसत आहे.

करीना काही महिन्यापूर्वीच कुटुंबासोबत टांझानिया सफारीसाठी गेली होती.

त्यावेळी करीनाने जेहसोबतच जंगल सफारी करतानाचे फोटो पोस्ट केले होते. यात करीना ही दुर्बिणीच्या सहाय्याने प्राणी पाहताना दिसत आहे.

VIEW ALL

Read Next Story