PM Modi on Congress : कोल्हापूरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

PM Modi on Congress : कोल्हापूरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

27 Apr 2024, 21:21 वाजता

श्रीराम मंदिराचं निमंत्रण नाकारून काँग्रेसकडून सनातनचा अपमान- मोदी

 

PM Modi on Congress : कोल्हापूरच्या सभेत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल... काँग्रेस देशावर राग काढत आहेत.. काँग्रेस सरकार आलं तर CAA रद्द करणार असं पंतप्रधान मोदी म्हणाले.. एक वर्ष एक पंतप्रधान काँग्रेसचा फॉर्म्युला असल्याचं मोदींचं वक्तव्य.. तर श्रीराम मंदिराचं निमंत्रण नाकारून काँग्रेसने सनातनचा अपमान केला असल्याचं मोदींचं विधान... काँग्रेसची अवस्था फार बिकट असल्याचं मोदींचं वक्तव्य.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

27 Apr 2024, 19:47 वाजता

पंतप्रधान मोदींकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा नकली शिवसेना असा उल्लेख

 

Modi, Shinde on Uddhav Thackeray : कोल्हापुरात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हटलंय. तर बाळासाहेबांचा परिवार काँग्रेसला मतदान करणारेय. यामुळे बाळासाहेबांच्या मनाला किती वेदना होत असतील असा हल्लाबोल शिंदे यांनी केलाय.

 

27 Apr 2024, 17:41 वाजता

उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना भाजपचं तिकीट

 

Ujjwal Nikam Candidature : उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आलीय.. उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केलीय.. तेव्हा वर्षा गायकवाड यांच्याविरोधात उज्ज्वल निकम मैदानात उतरणार आहेत. भाजपने विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट त्यामुळे कापलंय.. त्यांच्याऐवजी उज्ज्वल निकम रिंगणात आहेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Apr 2024, 16:59 वाजता

केंद्र सरकारकडून 6 देशांत कांदा निर्यातीला परवानगी

 

Onion Export Allowed : निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारनं मोठी घोषणा केलीये. कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली असून, 99 हजार 150 मोट्रीक टन कांदा निर्यात करता येणारे. सहा देशांमध्ये कांदा निर्यात होईल.. बांग्लादेश, युएई, भूतान, बहरीन मॉरिशस आणि श्रीलंकेत होणार कांदा निर्यात. तर 2 हजार मेट्रीक टन कांदा मीडल इस्ट आणि काही युरोपियन देशांत निर्यात केला जाणारे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Apr 2024, 14:32 वाजता

अजित पवारांचा 'झी २४ तास'वर गौप्यस्फोट

 

Ajit Pawar Exclusive Interview : सख्खे भाऊ श्रीनिवास पवार विरोधात का गेले? याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचा गौप्यस्फोट केलाय.. झी २४ तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या टू द पॉईंट मुलाखतीत ते बोलत होते. बारामतीचा उमेदवार बदलण्याची मागणी भावानं केली... उमेदवार बदल, सोबत राहिन असं त्यांनी सांगितलं, असा गौप्यस्फोट अजितदादांनी केलाय. दरम्यान, कोण उमेदवार द्यायचा हा आमचा अधिकार आहे, असंही अजितदादांनी यावेळी स्पष्ट केलं

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Apr 2024, 13:54 वाजता

उपमुख्यमंत्री अजित पवार 'झी २४ तास'च्या 'टू द पॉईंट' मुलाखतीत भावुक

 

Ajit Pawar Exclusive Interview : सख्खे भाऊ श्रीनिवास पवार विरोधात का गेले? याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचा गौप्यस्फोट केलाय.. झी २४ तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या टू द पॉईंट मुलाखतीत ते बोलत होते. बारामतीचा उमेदवार बदलण्याची मागणी भावानं केली... उमेदवार बदल, सोबत राहिन असं त्यांनी सांगितलं, असा गौप्यस्फोट अजितदादांनी केलाय. दरम्यान, कोण उमेदवार द्यायचा हा आमचा अधिकार आहे, असंही अजितदादांनी यावेळी स्पष्ट केलं.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Apr 2024, 13:20 वाजता

मालेगावमध्ये स्वाईन फ्लूनं 2 जणांचा मृत्यू

 

Malegaon Swine Flu : नाशिकच्या मालेगावमध्ये स्वाईन फ्ल्यूचा शिरकाव झालाय.. मालेगावातील एका माजी कृषी अधिकारी आणि एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे... या घटनेनंतर मालेगाव महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट झालाय. स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबातील आणि परिसरातील व्यक्ती यांचा शोध घेऊन त्यांची देखील आरोग्य तपासणी केली जात आहे... कोणालाही सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे आढळल्यास त्यांनी तातडीने मनपाच्या आरोग्य केंद्र येथे जाऊन उपचार घ्यावे असे आवाहन मालेगाव महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे

27 Apr 2024, 12:01 वाजता

पंतप्रधान मोदी आणि अमित ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार

 

Loksabha Election 2024 : पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे नेते अमित ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत...महायुतीच्या प्रचारासाठी 29 एप्रिलला पंतप्रधान मोदींची पुण्यात सभा होणारेय...या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित ठाकरे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत...पुणे, मावळ, बारामती आणि शिरूर लोकसभेसाठी मोदींची प्रचार सभा असणार आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Apr 2024, 11:16 वाजता

सांगलीत खासदार आणि बंडखोर नगरसेवकांमध्ये जुंपली

 

Loksabha Election 2024 : सांगली लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील आणि मिरजेतील भाजपाचे बंडखोर नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपलीय...दोन वेळा संधी दिलेल्या बाजार बुणग्यांना आता ठेचायची वेळ आलीय...तसेच उद्याच्या राजकारणात त्यांना  घरी बसल्याशिवाय स्वस्थ बसणार  नाही...असा इशारा खासदार संजयकाका पाटलांनी दिलाय...तर कुठला नेता आला आणि आम्हाला पाडायचं म्हटलं तर त्याच्या बाप जन्मी जमणार नाही...असं आव्हान  बंडखोर माजी नगरसेवक सुरेश आवटींनी दिलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 Apr 2024, 10:42 वाजता

विकास गोगावलेंची अनंत गीतेंवर बोचरी टीका

 

Loksabha Election 2024 : रायगडचे मविआ उमेदवार अनंत गीते यांच्यावर टीका करताना आमदार भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावलेंची जिभ घसरलीय. गीतेंना कानाखाली वाजवण्याची भाषा गोगावलेंनी केलीय. महापूर, अतिवृष्टी यावरुन प्रश्न विचारले असता गीते हसत होते असा आरोप करत विकास गोगावले आक्रमक झाले.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -