किती तापमानावर Heat Wave चा इशारा दिला जातो; ग्रीन, यलो अलर्टचा नेमका अर्थ काय?

Maharashtra Heat Wave: राज्यात गेल्या तीन-चार दिवसापासून उष्णतेची लाट आलेली आहे. पण उष्णतेची लाट म्हणजे काय? इशारा कधी दिला जातो, जाणून घ्या

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 24, 2024, 04:52 PM IST
किती तापमानावर Heat Wave चा इशारा दिला जातो; ग्रीन, यलो अलर्टचा नेमका अर्थ काय? title=
When is a heat wave declared in india in marathi

Maharashtra Heat Wave:  राज्यात तापमानाने चाळिशी पार केली आहे. अनेक जिल्ह्यात उन-पावसाचा खेळ सुरू आहे. हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उन्हाच्या काहिल्यामुळं नागरिक हैराण झाले आहेत. मुंबईचा ही पारा एप्रिलच्या मध्यातच 35 अंशाच्या वर पारा गेला आहे. त्यामुळे अंगाची काहिली होत आहे.मुंबईत आद्रता वाढत असल्याने घामाच्या धारा वाहत आहेत तर राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेच्या झळा जाणवत आहेत. 27 ते 29 एप्रिल दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. पण उष्णतेच्या लाटा म्हणजे काय? जाणून घेऊया. 

कमाल तापमानाचा कालावधी हा सामान्यतः मार्च ते जून दरम्यान होतो. ही उष्णता मानवासाठी धोकादायक ठरु शकते. अशा तीव्र तापमानामुळं शारिरीक ताण येऊ शकतो त्यामुळं एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. महाराष्ट्रातील पालघर येथे एका 16 वर्षीय तरुणीचा उष्माघातामुळं मृत्यू झाल्याची नोंद आहे. कमाल तापमानात वाढ झाल्यानंतर उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात येतो. 

उष्णतेच्या लाटेचा इशारा कसा ठरवण्यात येतो?

तापमान ठरवण्यासाठी जगभरात वेगवेगळ्या मानकांचा वापर केला जातो. काही देशांमध्ये तापमान आणि आद्रता ठरवण्यासाठी हिट इंडेक्सच्या आधारे उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात येतो. तर, काही देशांमध्ये गत वर्षीच्या तुलनेत जास्त तापमानाच्या आधारे उष्णतेच्या लाटेची माहिती देण्यात येते. भारतीय हवामान विभाग उष्णतेची लाट आलीये हे कसं ठरवतं, हे जाणून घेऊया. 

भारतीय प्रादेशिक विभाग हिट वेवचा अलर्ट मैदानी आणि डोंगराळ भागासाठी वेगवेगळे मापदंड आखते. मैदानी भागात कमाल तापमान 40 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचते तेव्हा IMD हिटव्हेवचा इशारा देते. तर, हिल स्टेशनवर तापमान 30 अंशापर्यंत पोहोचते तेव्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात येतो.  

IMD कडे देशभरातील विविध मेट्रोलॉजिकल पॅरामीटर्स मोजण्यासाठी सक्षम असलेले एक मोठे नेटवर्क आहे. याद्वारे, तापमान, दाब, वारा, वेग आणि दिशा यासारख्या गोष्टी मोजता येतात. या नेटवर्कद्वारे 1981-2010 या कालावधीसाठी कमाल तापमान दैनिक कमाल तापमान स्टेशन डेटाच्या आधारे तयार केले आहे. या आधारावर दिवसाचे सामान्य कमाल तापमान मोजण्यात आले आहे.

जर एखाद्या प्रदेशात सामान्य तापमान 40 अंश सेल्सियसपर्यंत जास्त असेल तर हिट वेव्हची स्थिती असते. जेव्हा तिथलं सामान्य तापमान 4 ते 5 डिग्रीपेक्षा अधिक असेल किंवा तापमान 6 अंशाच्या पुढे गेले तर गंभीर हिट व्हेवचा इशारा दिला जातो. 

उष्णतेच्या लाटेचा कलर कोड? 

भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन सयुंक्तपणे उष्णतेच्या लाटेचा इशारा देतात. यासाठी एका विशिष्ट्य पद्धतीचा कलर कोडदेखील जारी केला जातो. हा कलर कोड हिट वेवची तीव्रता सांगतो. 

हिरवाः कमाल तापमान सामान्य पातळीवर आहे. यामध्ये कोणतीही खबरदारी घेण्याची गरज नाही.

पिवळाः काही भागात 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहते. उष्णतेची लाट लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. यामध्ये उष्माघात टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आँरेजः उष्णतेची लाट 4 दिवस राहते. यावेळी पुरेसे पाणी पिण्याची आणि हायड्रेट राहण्याचा सल्ला दिला जातो. 

लालः गंभीर उष्णतेच्या लाटेचा इशारा दोन ते अधिक दिवसांपर्यंत राहतो. यात हिटस्ट्रोकचा धोका असतो. यात लोकांना प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)